शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गॅस दरवाढ विरोधात भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकारचा केला निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 15:34 IST

शेणी गौऱ्या जाळून चुलीवर जेवण बनवून केला मोदी सरकारचा निषेध 

- नितिन पंडीत 

भिवंडी: गॅस दरवाढ रोखण्यात केंद्र शासनाला पुरता अपयश आले असून दिवसेंदिवस घरगुती गॅस दरांमध्ये हॉबणाऱ्या दरवाढी विरोधात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्याभिवंडी शहर महिला अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जकात नाका येथील धर्मवीर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी चक्क चुलीवर जेवण बनून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा तीव्र निषेध केला . चुलीवर शेणी गौऱ्या जाळून यावेळी अंदोलनकर्त्या महिलांनी चुलीवर भाकऱ्या भाजल्या तसेच कांदा पोहा बनून उपस्थित आंदोलनकर्त्यांना हे चुलीवर बनवलेले गरमागरम जेवण खाऊ घातले .  

एकीकडे महिलांना चुलीच्या धुराचा त्रास होतो म्हणून पंतप्रधांनाही महिलांना गॅस देण्याचा बनाव केला . घराघरात गॅस दिली मात्र आता गॅसची दरवाढ होत असल्याने महिलांना गॅस सिलेंडर घेणे परवडणारे नसल्याने पुन्हा केंद्र सरकार महिलांना चुलीवर जेवण बनविण्यास भाग पडणार असल्याने फसव्या मोदी सरकारच्या गॅस दर वाढी विरोधात आज हे चुलीवर भाकरी भाजो आंदोलन करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दिली आहे . त्यातच देशात दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढू लागलाय, केंद्र सरकारचे यावर कोणतेच नियंत्रण नाही. सिलेंडरच्या दरात देखील वाढ होत असल्याने महिलांचं किचनमधील बजेट कोलमडल आहे.

महिलांवर येत्या दिवसात चुलीवर जेवण बनवण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यातच भाजपचे अच्छे दिन कुठे दिसलेच नाही मात्र बुरे दिनाची सुरवात आता पासून सुरु झाली असून आम्हाला आमचे जुने दिवसच पुन्हा आना तुमच्या फसव्या अच्छेदिनच्या बाटवण्या बंद करा अशा घोषणा यादरम्यान महिलांनी दिल्या . या आंदोलनाप्रसंगी भाजप सरकार विरोधात महिलांनी प्रचंड रोष व्यक्त करत आंदोलना दरम्यान बनवण्यात आलेल्या चुलीवरच्या जेवणाचा अस्वाद देखील कार्यकर्त्यांनी घेतला.

तर भाजपच्या या धोरणामुळे नागरिकांचे वाईट दिवस सुरु झाले असून येत्या काही दिवसात भीक मागण्याची वेळ येणार असून वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले असून आता आम्हाला मोदी सरकार पुन्हा अश्मयुगात नेणार का असा सवाल देखील शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी उपस्थित केला . या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यकर्ता जावेद फारुखी यांच्यासह महाला व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते . 

टॅग्स :BhiwandiभिवंडीthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा