शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

खड्ड्यांविरोधात डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन; खड्डे रंगवून लोकप्रतिनिधींची दिली नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 12:57 PM

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने डोंबिवलीत आज अनोखे आंदोलन केले.

ठळक मुद्दे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने डोंबिवलीत आज अनोखे आंदोलन केले.रस्त्यावर पडलेले खड्डे रंगवून आणि त्याला लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची नावे देऊन कल्याण डोंबिवली महापालिकेचा निषेध करण्यात आला.राष्ट्रवादीचे डोंबिवली शहराध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

डोंबिवली- रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने डोंबिवलीत आज अनोखे आंदोलन केले. रस्त्यावर पडलेले खड्डे रंगवून आणि त्याला लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची नावे देऊन कल्याण डोंबिवली महापालिकेचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे डोंबिवली शहराध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तसेच शुक्रवारी झालेल्या एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कल्याण डोंबिवलीतील नागरिक विविध नागरी समस्यांनी प्रचंड हैराण झाले आहेत. मात्र त्या सोडवण्याऐवजी सत्ताधारी राजकारण करण्यातच दंग झाले आहेत. एकीकडे नागरिकांकडून पद्धतशीरपणे कर वसुली केली जात असताना सुविधा देण्याची बोंब आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली. येथील पश्चिमेतील भागशाळा मैदानापासून सुरू झालेले हा आंदोलन घरडा सर्कलपर्यंत करण्यात आले. यावेळी खड्डे रंगवण्याबरोबरच त्या खड्डयांना महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची नावे देण्यात आली.

यावेळी आमदार जगन्नाथ शिंदे, कल्याण शहर राष्ट्रवादीचे संदीप देसाई, कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर, सरचिटणीस जगदीश ठाकूर, सुभाष गायकवाड, राष्ट्रवादी महिला विभागाच्या रेखा सोनावणे, संगीता मोरे, सेजल राऊळ यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.