नाशिकरोडला तीन दिवसांत दुसरा खून : अल्पवयीन मुलाला भोसकले
By Admin | Updated: May 25, 2017 18:21 IST2017-05-25T17:33:13+5:302017-05-25T18:21:58+5:30
गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जेलरोड येथील मंगलमुर्तीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाला भोसकल्याची घटना

नाशिकरोडला तीन दिवसांत दुसरा खून : अल्पवयीन मुलाला भोसकले
नाशिक : नाशिकरोड परिसरात तीन दिवसांपुर्वीच एका महिलेची हत्त्या झाल्याचे उघडकीस आले होते. सदर घटना ताजी असताना गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जेलरोड येथील मंगलमुर्तीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाला भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेत तुषार भास्कर साबळे (१६) या मुलाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा कसारा येथील पंचशीलनगर मधील रहिवासी असून दहावीची परीक्षा देऊन तो आपल्या मामाकडे सुटी घालविण्यासाठी आला होता. तो घराबाहेर पडला असता बुरखाधारी टोळक्याने येऊन त्याच्यावर धारधार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. भरदीवसा झालेल्या या हल्ल्याने नाशिकरोड परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. नाशिकरोड भागात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.