नारनवरेंनी पदाची सूत्रे स्वीकारली
By Admin | Updated: May 8, 2017 05:51 IST2017-05-08T05:51:13+5:302017-05-08T05:51:13+5:30
पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.प्रशांत नारनवरे यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी जिल्हाधिकारी

नारनवरेंनी पदाची सूत्रे स्वीकारली
लोकमत न्युज नेटवर्क
पालघर : पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.प्रशांत नारनवरे यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी सतीश देशमुख यांनी त्याचे स्वागत केले.
पालघरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची बदली अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून झाल्यानंतर त्यांच्या जागी उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र प्रशिक्षणासाठी ते मसुरी येथे गेल्याने अप्पर जिल्हाधिकारी देशमुख यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारीपदांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. काल संध्याकाळी डॉ.नारनवरे हे कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
डॉ. नारनवरे हे डेन्टींस्ट असून त्यांनी सायकोथेरपी आणि पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते भारतीय प्रशासन सेवेच्या २००९ च्या बॅचचे अधिकारी असून सामाजिक विकासाची प्रचंड आवडीतून त्यांनी केलेल्या कामांची दखल राज्यानेच नव्हे तर राजस्थानसारख्या राज्यानेही घेतलेली आहे. जलसंवर्धन हा त्यांचा आवडता विषय आहे. जलयुक्त शिवारचा त्यांचा उस्मानाबाद पॅटर्न सर्वत्र प्रसिद्ध असून त्याचे श्रेय डॉ.नारनवरे यांच्याकडे जाते. त्यांच्या कामांची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली असून स्थानपरत्वे काही बदल करून राजस्थान सरकारने हा पॅटर्न स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे क्लस्टर (गट) तयार करणे, तरु णांत शेती प्रक्रियेबाबत व विक्रीबाबत आवड निर्माण करणे, यात त्यांना विशेष गती आहे. ऊसा पलीकडे जाऊन शेतीक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी दोन वर्षाच्या कालावधीत कृषी क्र ांती प्रकल्पाद्वारे त्यांनी शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडविला. त्यांनी शेतकऱ्यांना सामुदायिक शेती साठी प्रोत्साहित केले. तब्बल १४ हजार ६०० शेतकऱ््यांचे गट व ५६ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ््यांना या धाग्यात जोडण्याचे काम केले.
सांगली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन ग्रामीण विकास कामात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन २०१३ मध्ये त्यांना यशवंत पंचायतराज अॅवॉर्डने गौरविण्यात आले होते.
तर गेल्यावर्षी नागरी सेवा दिनी उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा गौरव झाला. केंद्रीय ग्रामीण विकास विभागा तर्फे २०१६ मध्ये त्यांना चॅम्पियन आॅफिसर म्हणून आमंत्रित करण्यात आले. २२ राज्यातील निवडक २५ अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा त्यात समावेश होता. त्यामुळेच त्यांच्या कारकिर्दीकडे जिल्हा अपेक्षेने पहातो आहे.