बाबासाहेबांनी लिहिलेली घटना नरेंद्र मोदी कधीच बदलणार नाहीत

By Admin | Updated: January 14, 2017 06:22 IST2017-01-14T06:22:47+5:302017-01-14T06:22:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. नोटाबंदीमुळे गरीबांना न्याय मिळणार आहे. त्यांच्या भावना खूप चांगल्या आहेत.

Narendra Modi will never change the events written by Babasaheb | बाबासाहेबांनी लिहिलेली घटना नरेंद्र मोदी कधीच बदलणार नाहीत

बाबासाहेबांनी लिहिलेली घटना नरेंद्र मोदी कधीच बदलणार नाहीत

शहापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. नोटाबंदीमुळे गरीबांना न्याय मिळणार आहे. त्यांच्या भावना खूप चांगल्या आहेत. विरोधकांना टीका करू देत, मोदी त्यांचे काम करीत आहेत. मोदींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप आदर आहे. बाबासाहेबांचे भारतीय संविधान ते कदापि बदलणार नाहीत, असे मला त्यांनी विश्वासपूर्वक सांगितल्याचे आठवले यांनी या वेळी येथे सांगितले.
शहापूर तालुका धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने गोठेघर येथे आयोजित केलेल्या भारतीय संविधान सन्मान आणि भव्य सत्कार समारंभ या सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
या प्रसंगी खा. कपिल पाटील, आ. पांडुरंग बरोरा, ठाणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दशरथ तिवरे, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुभाष हरड, शहापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता धानके, सामाजिक न्याय विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात, धम्म बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे अध्यक्ष, अशोक उबाळे, आरपीआयचे जयवंत थोरात, आरपीआय सुरेश सावंत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
खा. कपिल पाटील आणि आ. पांडुरंग बरोरा यांनी या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरक असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. खा. कपिल पाटील यांच्या हस्ते रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Narendra Modi will never change the events written by Babasaheb