राज ठाकरेंनी घेतली अविनाश जाधवांची भेट; नांदगावकरही होते उपस्थित
By सुरेश लोखंडे | Updated: July 24, 2023 19:59 IST2023-07-24T19:58:24+5:302023-07-24T19:59:58+5:30
गेल्या काही दिवसांपासून जाधव आजारी आहेत. ते काही ज्युपीटरमध्येही उपचार घेत होते.

राज ठाकरेंनी घेतली अविनाश जाधवांची भेट; नांदगावकरही होते उपस्थित
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे व नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची ठाणे येथील राहत्या घरी भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.
गेल्या काही दिवसांपासून जाधव आजारी आहेत. ते काही ज्युपीटरमध्येही उपचार घेत होते. त्यांच्या या आजारपणाचे कळताच ठाकरे व नांदगांवकर यांनी सध्याच्या अतिमहत्त्वाच्या कामातून वेळ काढून आज सोमवारी जाधव यांची भेट घेऊन तब्बेतीची काळजी घेण्यास जाधव यांना मार्गदर्शन केले.
आज संध्याकाळी ठाकरे यांनी घरी यैऊन घेतलेल्या या भेटीमुळे जाधव यांच्यासह त्यांच्या परिवाराला व मनसे सैनिकांना मोठे भावनिक बळ मिळाल्याचे ठाणे मनसेचे अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सांगितले.