सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील व्यापा-याचे १४ लाखांचे दागिने लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 18:34 IST2018-01-18T18:24:39+5:302018-01-18T18:34:47+5:30

लग्नासाठी जुने दागिने नव्याने उजळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील एका व्यापा-याला त्याच्याच नातेवाईकाने तब्बल अर्धा किलोचे दागिने घेऊन पलायन केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस तपास करीत आहेत.

 In the name of making gold ornaments looted jewelery worth 14 lakhs of Thane merchandise | सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील व्यापा-याचे १४ लाखांचे दागिने लुबाडले

अर्धा किलोचे दागिने घेऊन पलायन

ठळक मुद्देमामे भावानेच केली फसवणूकदागिने घेऊन झाला पसारनौपाडा पोलिसांकडे तक्रार

ठाणे: जुने सोन्याचे दागिने नव्याने बनवून देण्याच्या नावाखाली चरईतील विक्रमकुमार जेैन यांचे १४ लाख ६७ हजार ७७४ रुपयांचे सोन्याचे दागिने त्यांचाच मामे भाऊ कमलेश जैन याने लुबाडल्याची घटना १२ ते १७ जानेवारी दरम्यान घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चरईतील धोबी आळीमध्ये राहणारे कपडयाचे व्यापारी विक्रमकुमार यांच्या मुलाचे लग्न असल्यामुळे त्यांना नविन सोन्याचे दागिने बनवायचे होते. त्यामुळे जुने सोन्याचे दागिने नविन बनवून देतो, अशी बतावणी कमलेशने (रा. अजयनगर, भिवंडी) याने केली. कमलेशच्या वडीलांचे अर्थात विक्रमकुमार यांच्या मामाचे पूर्वी सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भिवंडीमध्ये दुकान होते. मामांच्या निधनानंतर हे दुकान बंद पडले. परंतू, मामाच्या मुलाला दागिने बनविण्याचे काम चांगल्या प्रकारे येते. याच बहाण्याने विक्रमकुमार यांचा त्याने विश्वास संपादन करुन त्यांच्या धोबीअळीतील घरी तो आला. त्यांच्याकडून त्याने ५४३ ग्रॅम ६२० मिली ग्रॅम वजनाचे जुने सोन्याचे दागिने घेतले. हे दागिने त्याने परत न करता त्यांचा त्याने अपहार करुन स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. वारंवार मागणी करुनही त्याने हे दागिने परत न केल्यामुळे अखेर विक्रमकुमार यांनी १७ जानेवारी रोजी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शिरीष यादव हे याप्रकरणी तपास करीत आहेत.

Web Title:  In the name of making gold ornaments looted jewelery worth 14 lakhs of Thane merchandise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.