उल्हासनगर महापालिकेचा नमस्ते उपक्रम, भुयारी गटार व मैला वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

By सदानंद नाईक | Published: February 14, 2024 04:48 PM2024-02-14T16:48:28+5:302024-02-14T16:48:51+5:30

बुधवारी सकाळी ११ वाजता नमस्ते कार्यक्रमाचे आयोजन केले असून अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Namaste initiative of Ulhasnagar Municipal Corporation, participation of employees of underground sewers and sewers | उल्हासनगर महापालिकेचा नमस्ते उपक्रम, भुयारी गटार व मैला वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

उल्हासनगर महापालिकेचा नमस्ते उपक्रम, भुयारी गटार व मैला वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

उल्हासनगर : महापालिकेने नमस्ते उपक्रमा अंतर्गत शहरातीलभुयारी गटार व मैला वाहून नेणाऱ्या कामगारांना शासनाच्या विविध शासकीय योजनेची माहिती दिली. मिडटॉउन हॉल मध्ये बुधवारी सकाळी ११ वाजता नमस्ते कार्यक्रमाचे आयोजन केले असून अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व उपायुक्त सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिड टाऊन हाॅल मध्ये सकाळी ११ वाजता नमस्ते उपक्रम अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मैला व्यवस्थापन व भुयारी गटार स्वच्छता करणा-या कर्मचा-यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अतिरिक्‍त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी मार्गदर्शन केले. सफाई कर्मचारी यांच्या राहणीमानाचा दर्जा वाढविणे, विविध विमा योजना, आरोग्य योजना बद्दल माहिती लेंगरेकर यांनी दिली आहे. तसेच सफाई करणेकरिता सरकार तर्फे देण्यात येणा-या सबसिडीबाबत माहिती संस्थेच्या राधा कुसट यांनी दिली. 

महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी स्वयं सुरक्षिततेची काळजी घेवून सफाईचे काम कसे करावे? स्वयं संरक्षणात्मक साहित्याचा वापर का करावा? सफाईसाठी वापरण्यात येणा-या विविध संसाधनांचा योग्य वापर करणेबाबत तसेच सफाईचे साधने व वाहने खरेदी करताना शासनातर्फे सफाई कर्मचारी यांना देण्यात येणा-या सबसिडी आदींची माहिती नमस्ते उपक्रम अंतर्गत दिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत व बचत गट कसे तयार करायचे याबद्दल मार्गदर्शन विविध विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने सफाई कामगार उपस्थित होते.
 

Web Title: Namaste initiative of Ulhasnagar Municipal Corporation, participation of employees of underground sewers and sewers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.