ठाण्यात 'माझं कुटुंब माझी जाहिरातबाजी'; जनतेच्या पैशांवर नगरसेविकांच्या पतीराजांची चमकोगिरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:32 IST2021-05-28T17:31:53+5:302021-05-28T17:32:08+5:30

बॅनरवरील नातेवाईकांचे फोटो हटवा : मनसेसह सामाजिक संघटनांची मागणी  . ठाणे पालिकेच्या तिजोरीत आधीच खडखडात असताना प्रभाग सुधारणा निधीचा बिनदिक्कतपणे अपव्यय सुरु असल्याची बाब समोर आली आहे.

'My family is my advertising' in Thane; Shining of women corporators husbands | ठाण्यात 'माझं कुटुंब माझी जाहिरातबाजी'; जनतेच्या पैशांवर नगरसेविकांच्या पतीराजांची चमकोगिरी  

ठाण्यात 'माझं कुटुंब माझी जाहिरातबाजी'; जनतेच्या पैशांवर नगरसेविकांच्या पतीराजांची चमकोगिरी  

लोकमत नव नेटवर्क 
ठाणे : आयजीच्या जीवावर बायजी हुशार, बायकोच्या पदावर नवरा सुभेदार ! अशी नवीनच म्हण सध्या ठाण्यात बोलली जात आहे. कारणही तसंच आहे. आरक्षणामुळे ज्यांना ज्यांना त्यांच्या पत्नींना निवडणुकीत उभे करावे लागले, त्या सर्व नगरसेविकांचे नवरोबा आपणच नगरसेवक असल्याच्या थाटात फिरताना दिसतात. इथपर्यंत ठीक होतं, मात्र आता जणू आपण या नगराचे मालक असल्याच्या थाटात नगराच्या प्रवेशद्वारावर जनतेच्या पैशावर बॅनरबाजी करण्याची नवी टूम ठाण्यात आली आहे.


  कोरोना काळात एकीकडे मुख्यमंत्री 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' अशी भावनिक साद घालत नागरिकांना आवाहन करत असताना ठाणे शहरातील त्यांच्या शिवसेनेच्या शिलेदारांनी 'माझं कुटुंब माझी जाहिरातबाजी' अशा उक्तीनुसार नातेवाईकांच्या फोटोची डिजिटल बॅनरवर छबी झळकवली आहे. प्रभाग क्रमांक पाच आणि सातमधील शिवसेना नगरसेविकांच्या पतीचे फोटो या डिजिटल बॅनरवर दिसत असून जनतेच्या कररूपी पैशांवर सुरु असलेली ही चमकेशगिरी तात्काळ थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह या भागातील सामाजिक संघटनांनी  केली आहे.


ठाणे पालिकेच्या तिजोरीत आधीच खडखडात असताना प्रभाग सुधारणा निधीचा बिनदिक्कतपणे अपव्यय सुरु असल्याची बाब समोर आली आहे. प्रभाग क़्र. ५ मध्ये संस्कार पब्लिक शाळेजवळील शिवाईनगर नगरच्या स्वागताचा बोर्ड व प्रभाग क़्र ७ मध्ये वर्तकनगरात डिजिटल बोर्ड उभारण्यात आले आहेत. या फलकांवर वर्तकनगर येथे शिवसेना नगरसेविका राधिका फाटक यांचे पती राजेंद्र फाटक आणि शिवाईनगरात शिवसेनेच्या नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांचे पती भास्कर बैरीशेट्टी यांची छबी झळकली आहे. नगरसेविकेचे पती हे कोणत्याही प्रशासकीय हुद्यावर अथवा स्वत: नगरसेवक नाहीत. त्यांचा फाटो कोणत्या हेतुने लावला की यामागे निव्वळ राजकीय स्वार्थ आहे, असा प्रश्न मनसेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केलेल्या मागणीनंतर मनविसे उपशहराध्यक्ष संदीप चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: 'My family is my advertising' in Thane; Shining of women corporators husbands