शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अखेर राष्ट्रवादीचं ठरलं! जितेंद्र आव्हाडांकडून मोठी घोषणा; भाजपचं टेन्शन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:26 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मांडली भूमिका; पालिका निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय अवलोकन करण्यात आले. एकमताने महाविकास आघाडी व्हावी, अशीच इच्छा व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे  यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात कोणीही बोलू नये, असे आमचे आपापसात ठरवण्यात आले आहे. समोरुन जरी कोणी बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे काही नाही. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी हा भाजप असून त्यासाठी महाविकास आघाडी आवश्यक आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची असल्याचे मत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यासाठी आव्हाड यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर ते पत्नकारांशी बोलत होते.महाराष्ट्रात एकत्न येऊन राज्य पातळीवर एकमेकाला साह्य करत भाजपच्या प्रवृत्तीविरुद्ध आपण लढत आहोत. जसे संजय राऊत यांच्या बाजूने सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत किंवा शरद पवार हे जसे वारंवार सर्वच नेत्यांची बाजू लढवित आहेत. त्याच धर्तीवर राज्यभर पक्षविरहीत वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण व्हायला हवे, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांचे मनोमिलन फार गरजेचे आहे. त्यामुळेच सर्वांनी एकमताने महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेनेची चर्चा करणार का, यावर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. आमच्यातर्फे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हे चर्चा करणार आहेत. शिवाय, या चर्चेसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तीन ते चार जणांची समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मुलाखती देत आहेत; त्याकडे पाहता, ते सकारात्मक भूमिका घेत असल्याचे दिसून आल्यानेच आम्ही पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडीमध्ये मतभेद असतात. पण, ते बाजूला सारुन किमान समान कार्यक्रम करुन पुढे जावेच लागते. चर्चेला बसल्यावर अजेंडा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडी करायची असेल तर दोन्ही पक्षातील नेत्यांनी सामंज्यस्याची भुमिकी घ्यावी लागते - एकनाथ शिंदे राज्यात महाविकास आघाडी आहे, त्यामुळे आम्ही आघाडीच्या बाजुने आहोत. आमच्याकडून सुरवातीपासून केव्हा टिकी केली गेली नव्हती. परंतु समोरुन जर टिका होत असेल तर त्याला प्रतिउत्तर हे द्यावेच लागते. त्यामुळे सर्वानी संभाळून बोलावे, आघाडी करायची असेल तर दोन्ही पक्षातील नेत्यांना सामंजस्याची भुमिका घ्यायला हवी अशा प्रतिक्रिया ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना