शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आमचं तसं ठरलंय! शिंदे अन् आव्हाडांचा सुरात सूर; भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 23:26 IST

आव्हाड, शिंदे यांच्यामधलं शीतयुद्ध थांबलं; भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ठाणे : मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आघाडीबाबत राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना आदेश दिल्यानंतर त्याच दिवशी लोकमान्य नगरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना आम्ही दोघे एकत्र होतो. राज्याच्या विकास लक्षात घेउन एकत्र काम करत आहोत, आम्ही नगरविकास विभागाला दिलेले प्रस्ताव तात्काळ मान्य होत असल्याचे सांगून जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तर म्हाडाच्या माध्यमातून अनेक वर्ष रेंगाळला बीडीडी चाळ असो किंवा नायगांव असो या सर्व भागांचा विकास झाला असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांच्या कामांचे कौतुक केले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी आघाडीकडे एक एक पाऊल पुढे टाकले असल्याचे जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. लोकमान्य चैती  नगर परिसरतील विठ्ठल क्रीडा मैदानात  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात आली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे उपस्थिती होते. यावेळी आव्हाड यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी इतिहासातील अनेक गोष्टींना उजाळा दिला. स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आपल्या भाषणात  ४० वर्षात  लोकमान्य नगर मध्ये सामाजिक अनेक कामे केली असल्याचे सांगितले.  लोकमान्य नगर हे दीड ते दोन लाख वस्तीचे गाव आहे.  ठाण्यातील ६२ टक्के नागिरीक जे धोकादायक मध्ये राहतात त्यांना सुरक्षित करण्यासाठी एक दिवस ठाणे बंद ठेवले. हे काम शिंदे साहेबानी मनावर घेतले.. नागपूर अधिवेशनात अवाज उठवला. जितेंद्र आव्हाड यांनी यामध्ये परिश्रम घेतले. आणि महापौरांनी सभागृहात प्रस्ताव मंजूर केला. दोन्ही मंत्र्यांनी क्लस्टरसाठी सिंहाचा वाटा उचलला आहे. १५० एकरचा हा भाग आहे. ५० ते ६० वर्षांपासून वस्ती आहे. ज्या पद्धतीने किसन नगरचे काम वेगाने सुरु आहे तशी लोकमान्य नगर क्लस्टरचा दुसरा क्रमांक लावावा. महाराष्ट्र असं कोणते शहर नसेल जिथे गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री ठाण्याला लाभले आहे. २० ते २५ सहकारी संस्था निर्माण केल्या आहेत. १० हजार नागरिकांचे बायोमेट्रिक झाले आहे. उर्वरित १० हजारांचे बायोमेट्रिक होणार आहे. ज्यावेळी ही योजना जाहीर झाली त्याचवेळी सांगितलं होतं शिंदे साहेब सांगतील तशीच योजना ठिकाणी राबवली जाईल असे जगदाळे यांनी स्पष्ट केले.  

म्हाडाच्या योजना स्वीकारा, एका महिन्यात योजना मार्गी लागेल; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणापुनर्विकासाच्या योजना हेच मुंबई ठाण्याच्या विकासाचे गणित आहे. म्हाडाकडे जेवढी जमीन आहे तेवढी कोणाकडे नाही. म्हाडाच्या योजना स्वीकारा, एक महिन्यात तुमची योजना मार्गी लागेल अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केली आहे. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, म्हाडाच्या एनए  टॅक्सवर लागलेली पेनल्टी माफ करण्याची मागणी करण्यात आली होती. ती  मान्य केली.  पुनर्विकासाच्या योजना हेच मुंबई ठाण्याच्या विकासाचे गणित आहे. म्हाडाकडे जेवढी जमीन आहे तेवढी कोणाकडे नाही. म्हाडाच्या योजना स्वीकारा, एक महिन्यात तुमची योजना मार्गी लागलेली  असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  म्हाडाच्या निमित्ताने ३५ वर्ष थांबलेली नायगावचा पुनर्विकस मार्गी लागला आहे. बीडीडी चाळीचाही विकास मार्गी लागला असल्याचे त्यांनी सांगितले. 

किसननगर नव्हे तर संपूर्ण ठाण्यात क्लस्टरला गती दिली जाईल; एकनाथ शिंदे यांची घोषणाएकनाथ शिंदे यांनी राज्यात महाविकस  आघाडीचे सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.  शिवरायांचा कारभार असा असावा हे शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे. शिवरायांनी दाखवून दिलेला मार्ग आहे त्या पद्धतीने काम केले तर समाधान लाभेल शिंदे म्हणाले.  मुंबईत बीडीडी चाळ असेल, पत्रा चाळ असेल हे काम मार्गी लावण्याचे काम म्हाडाने केले आहे. क्लस्टर केवळ किसन नगरसाठी नव्हे तर हा प्रकल्प संपूर्ण ठाणे शहरासाठी केला आहे. साईराज इमारत पडली तेव्हापासून क्लस्टरसाठी संघर्ष सुरु होता. त्यावेळी सरकार म्हणाले हे अनधिकृत आहे. मी दोन वेळा निलंबित झालो. आम्ही उघड्या डोळ्याने इमारती पडताना पाहणार नाही ही भूमिका घेतली आणि तेव्हा क्लस्टरला मंजुरी मिळाली. क्लस्टरमध्ये यापूर्वी अनेक त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर केल्या. मालकाला सुद्धा मोबदला देऊ केला. मात्र सरकारचा विरोध होता. मला सांगायला आनंद होतो कि आमचे सरकार हे पूर्ण करणार. विकासक येणार नाही हे लक्षात आल्यानंतर सिडको आणि ठाणे महापालिका एकत्र आणून विकास करण्याचे निश्चित केले. तेवढेच प्राधान्य हे लोकमान्य नगरला दिले जाईल. क्लस्टरमध्ये आपण केवळ इमारती बांधणार नसून सर्वांगीण विकास होणार आहे. हक्कांच्या घराच्या स्वप्नपूर्तीकडे येतोय. सर्व कामे बाजूला ठेवा क्लस्टर योजना वेगात राबवा. मुंब्रा,कौसा यासाठीही  क्लस्टर हाच  पर्याय आहे. 

महापौर नरेश म्हस्के यांनीही दिले आघाडीचे संकेत लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होत होते तेव्हा ज्याप्रमाणे व्यासपीठावर एकत्र बसले होते. तसेच चित्र आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळत असल्याचे सांगून महापौर नरेश म्हस्के यांनी देखील यावेळी आघाडीचे संकेत दिले.  क्लस्टरसाठी योजना मार्गी लागली आहे. दोन वर्ष सरकारमध्ये आहोत. पण हणमंत जगदाळे  सांगायचं आम्ही आणि ऐकायचं हे सर्वाना माहिती आहे. आघाडीत आहोत कि नाही हे कधी पहिले नाही. सत्तेत असलो तरी वेगळा न्याय कोणाला दिला नाही. एकनाथ शिंदे हे क्लस्टर योजना राबवत आहे ते केवळ किसन नगरसाठी नाही तर लोकमान्य, राबोडी, इतर सर्वच ठिकाणी यशस्वी करण्यासाठी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस