म्हारळमध्ये तरुणाचा खून, आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:46 IST2021-09-12T04:46:34+5:302021-09-12T04:46:34+5:30
म्हारळ : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा भर चौकात खून झाल्याची घटना म्हारळ येथे घडली असून, पोलिसांनी आरोपींना काही तासांतच ...

म्हारळमध्ये तरुणाचा खून, आरोपी अटकेत
म्हारळ : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा भर चौकात खून झाल्याची घटना म्हारळ येथे घडली असून, पोलिसांनी आरोपींना काही तासांतच अटक केली.
फिर्यादी दिनेश सुरडकर (रा. गुप्ता किराणा शेजारी, म्हारळ) आणि आरोपी संदीप दामले याची चौकाजवळील गुप्ता किराणा दुकानानजीक मस्करीमध्ये शिवीगाळ सुरू होती. दरम्यान, त्यावेळी अनिल दुधाडे (२५) तेथे आला आणि तो दोघांची भांडणे सोडवू लागला. परंतु, त्याच दरम्यान दुसरा आरोपी दीपक दामले तेथे पोहोचला. त्यास अनिल हा संदीप यास मारहाण करतोय, असा गैरसमज झाला व त्याने चाकूने अनिल यास भोसकले. त्यावेळी दिनेश हा त्याला वाचवायला गेला. परंतु, संदीपने त्यास मारहाण करण्यास सुरुवात केल्याने दीपक याने अनिल यास पुन्हा मानेवर, दंडावर आणि कमरेवर वार केले. त्यामुळे अनिल याचा मृत्यू झाला. टिटवाळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच काही तासांतच आरोपींना अटक केली.
-------------------