भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरूणाची हत्या, त्रिकूट गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:41 IST2018-12-09T13:39:04+5:302018-12-09T13:41:57+5:30
भिवंडी : किरकोळ वादातून झालेले भांडण सोडवण्यास गेलेल्या तरूणाला मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील गायत्रीनगरमध्ये घडली. ...

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरूणाची हत्या, त्रिकूट गजाआड
भिवंडी: किरकोळ वादातून झालेले भांडण सोडवण्यास गेलेल्या तरूणाला मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील गायत्रीनगरमध्ये घडली.
साजिद साबीर अली शेख (१८) असे मृत तरूणाचे नाव आहे.त्यास शमीम रजा शमशुल हक अंसारी, अर्शद शमसूल हक अंसारी आणि अहमद मुर्तुजा मुस्तफा खान यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. शमीम व अर्षद यांच्या आईने जवळच्या मोहल्ल्यात रहाणाऱ्या सद्दाम जलालूद्दीन शेख यांस मुलगा मानल्याने त्यास काही रक्कम उधार दिली होती. सद्दामने आपल्या आईकडून पैसे घेतल्याने गैरसमज झालेल्या शमीम,अर्षद व मुर्तुजा यांनी त्यास जाब विचारीत भांडण केले. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी साजीद शेख गेला असता जाब विचारणा-या तिघांनी मिळून साजीदला लाकडी दांड्याने व दुचाकीच्या शॉकपसरने जबर मारहाण केली. या मारहाणीत साजीदचा मृत्यू झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अकरमउद्दीन यांने गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी पोलिस निरिक्षक मनजीत बग्गा यांनी शमीम,अर्शद व मुर्तुजा यास अटक केली आहे.