वखारीत काम करणाऱ्या मजुराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:38 IST2021-03-24T04:38:48+5:302021-03-24T04:38:48+5:30

भिवंडी : भिवंडीतील धामणकर नाका येथील पटेल कम्पाउंड या ठिकाणी केळ्याच्या वखारीत काम करणाऱ्या मजुराची हत्या झाल्याची घटना मंगळवारी ...

Murder of a warehouse worker | वखारीत काम करणाऱ्या मजुराची हत्या

वखारीत काम करणाऱ्या मजुराची हत्या

भिवंडी : भिवंडीतील धामणकर नाका येथील पटेल कम्पाउंड या ठिकाणी केळ्याच्या वखारीत काम करणाऱ्या मजुराची हत्या झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीताराम यादव (वय ३५) असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे. भय्यासाहेब आंबेडकर नगरमधील रस्त्यावर केळ्याची वखार असून, तेथे कच्ची केळी पिकवून घाऊक विक्री करण्याचे गोदाम आहे. या ठिकाणी हत्या झालेला मजूर हमालीचे काम करीत होता. रात्री काम संपवून त्याच गोदामात तो झोपला असता रात्री ही हत्या झाली. या घटनेची माहिती सकाळी मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी गेले. या प्रकरणी केळ्याच्या वखारीत काम करणाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Murder of a warehouse worker