पूर्ववैमनस्यातून भांडण करण्यास गेलेल्या युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:08 IST2018-11-26T21:05:31+5:302018-11-26T21:08:03+5:30

भिवंडी : पुर्व वैमनस्यातून भांडण करण्यासाठी शहरातील समदनगर येथे गेलेल्या युवकाची आज सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास हत्या झाली. या ...

The murder of a teenager who went to fight a pre-emptive fight | पूर्ववैमनस्यातून भांडण करण्यास गेलेल्या युवकाची हत्या

पूर्ववैमनस्यातून भांडण करण्यास गेलेल्या युवकाची हत्या

ठळक मुद्देपुर्व वैमनस्यातून भांडण करण्यासाठी गेलेल्या युवकाची हत्या गबरू खान व अस्फाक अन्सारी यांच्यातील वाद विकोपालागबरू खान याच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून हत्या

भिवंडी : पुर्व वैमनस्यातून भांडण करण्यासाठी शहरातील समदनगर येथे गेलेल्या युवकाची आज सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास हत्या झाली. या प्रकरणी दुपारी उशीरा गुन्हा नोंदविला असून पोलीसांनी या प्रकरणी एका युवकास अटक केली आहे.
अमीर उर्फ गबरू जमील खान (२२)असे मृत तरूणाचे नांव असुन तो शहरातील अजमेर येथे आपल्या कुटूंबासह रहात होता. तो रिक्षाचालक असून त्याचे पंधरा दिवसांपुर्वी समदनगर तलाव येथील अश्फाक अन्सारी या युवका बरोबर भांडण झाले होते. या बाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दाखल होती. तर काल रविवार रात्री शहरातील वंजारपाटीनाका येथे पुन्हा दोघांचे भांडण झाले. या भांडणाचा राग मनात ठेवून अमीर उर्फ गबरू खान हा आज पहाटेच्या सुमारास चार साथीदारांसह समदनगर परिसरात गेला होता. तेथे अश्फाक अन्सारी व रिजवान यांच्याबरोबर गबरू खान बरोबर झालेले भांडण विकोपाला गेले. त्याच वेळी गबरूच्या पोटात धारदार शस्त्र खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रसंगी अतिरक्तस्त्राव झाल्याने गबरू खान जमिनीवर कोसळला. त्याच्या सोबत आलेल्या साथीदारांनी त्यास तातडीने येथील इंदिरागांधी स्मृती रूग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले.तेंव्हा तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच स्थानिक शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अश्फाक अन्सारी या युवकास ताब्यात घेतले असून  सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रि या सुरू होती.

Web Title: The murder of a teenager who went to fight a pre-emptive fight