डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याच्या हत्येचा कट उधळला

By Admin | Updated: June 29, 2015 02:35 IST2015-06-29T02:35:44+5:302015-06-29T02:35:44+5:30

भाजपा कल्याण डोंबिवली मंडळचे ग्रामीण उपाध्यक्ष तथा सागाव-सागर्लीचे माजी सरपंच महेश पाटील यांच्या हत्येचा कट पोलिसांच्या ठाणे क्राइम ब्रँचने उधळून लावला आहे.

The murder of the BJP office bearer of Dombivli has been cut | डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याच्या हत्येचा कट उधळला

डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याच्या हत्येचा कट उधळला


डोंबिवली : भाजपा कल्याण डोंबिवली मंडळचे ग्रामीण उपाध्यक्ष तथा सागाव-सागर्लीचे माजी सरपंच महेश पाटील यांच्या हत्येचा कट पोलिसांच्या ठाणे क्राइम ब्रँचने उधळून लावला आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून, विशेष बाब म्हणजे अटक आरोपींमध्ये राष्ट्रवादीचे स्थानिक नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील यांचा पुतण्या कुणाल पाटील याचा समावेश आहे. कुणाल हा गोळवलीचा माजी उपसरपंच आहे.
महेश पाटील यांची हत्या करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मारेकरी आणण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच हा कट आखला होता. याची माहिती मिळताच क्राइम ब्रँचने सात जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. या अटक आरोपींकडून काही देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आली आहेत. त्यांना रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: The murder of the BJP office bearer of Dombivli has been cut