शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

हत्या, बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक, रिक्षाचालकाने पैशासाठी केले कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 4:54 AM

अंबरनाथ शहर हादरवून सोडणा-या हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय नरवडे (३०) असे त्याचे नाव आहे.

अंबरनाथ/टिटवाळा - अंबरनाथ शहर हादरवून सोडणा -चां हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय नरवडे (३०) असे त्याचे नाव आहे. तो उल्हासनगरचा रिक्षाचालक असून, त्याने पैशांसाठी ही हत्या केली आणि तरुणीवर बलात्कार केला. अवघ्या सहा दिवसांत त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.नरवडे याच्याकडून रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आले असून, त्याला टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात चोरी, लूटमार, बलात्काराचे आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गोंदी पोलीस स्टेशनमध्ये चोरी, लूटमार व इतर गुन्ह्यांची नोंद आहे.अंबरनाथच्या चिंचपाडा येथून नालंबीकडे जाणाºया डोंगरातील रस्त्यावर गणेश दिनकर हा तरुण आपल्या प्रेयसीसोबत बसला होता. त्याच्याकडे बुलेट गाडी होती. चोरट्याने पैसे उकळण्यासाठी गणेश आणि त्याच्या पे्रयसीला बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. सोबत, मोबाइल आणि बुलेटची चावी मागितली. चावी आणि मोबाइल घेतल्यावर त्याने बंदुकीचा धाक दाखवत, गणेशच्या पे्रयसीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याला गणेशने विरोध करताच, नरवडेने गणेशवर चार गोळ्या झाडत त्याचा खून केला. त्यानंतर, पळून न जाता त्याने गणेशच्या पे्रयसीवर बलात्कार केला. या प्रकारानंतर घटनास्थळी कोणताच पुरावा न ठेवता तो पळून गेला. मात्र, गणेशच्या प्रेयसीने केलेल्या वर्णनावरून त्याचे रेखाचित्र काढण्यात आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. त्यातील ठाणे ग्रामीण गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने, या प्रकरणाचा तपास करत उल्हासनगरमधून संजय नरवडे या रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. तो एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. संजय यानेच जास्त पैसे मिळविण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबला होता. पैशांसाठीच त्याने गणेश आणि त्याच्या प्रेयसीकडून पैशांची मागणी केली होती. मात्र, त्यांनी विरोध केल्यानेच गणेशला मारावे लागल्याचे त्याने सांगितले, तसेच त्या तरुणीवर बलात्कार केल्याचेही त्याने कबूल केले.असा केला तपासया प्रकरणाचा तपास करणाºया पोलीस पथकाने आधी अंबरनाथ पट्ट्यातील अंमली पदार्थ सेवन करणाºयांचा शोध घेतला. ज्या पद्धतीने चोरी, हत्या व बलात्कार करण्यात आला, त्यावरून हे काम सराईत गुन्हेगाराचे किंवा अमली पदार्थांचे सेवन करणाºयाचे असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे सर्व गर्दुल्ल्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली, तसेच त्यांच्यापैकी कोणाकडे रिव्हॉल्व्हर आहे का, याचा तपासही पोलिसांनी केला होता. त्याच वेळी शस्त्राचा धाक दाखवत, चोरी करणाºया संभाव्य चोरट्यांची माहितीही पोलिसांनी काढली होती. त्या आधारावर या आरोपीला अटक झाल्याचे समोर येत आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपीचा शोध नेमका कसा लागला, याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा