विनयभंग करणाऱ्या वृद्धाला अटक

By Admin | Updated: October 11, 2016 02:52 IST2016-10-11T02:52:51+5:302016-10-11T02:52:51+5:30

जाता येता धक्के देऊन तसेच वेगवेगळया प्रकारे एका ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या ६५ वर्षीय दुलाजी लाड या वृद्धाला वागळे

Munked old man arrested | विनयभंग करणाऱ्या वृद्धाला अटक

विनयभंग करणाऱ्या वृद्धाला अटक

ठाणे : जाता येता धक्के देऊन तसेच वेगवेगळया प्रकारे एका ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या ६५ वर्षीय दुलाजी लाड या वृद्धाला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ठाणे न्यायालयाने त्याला २५ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात राहणाऱ्या या महिलेला त्याच परिसरातील दुलाजी हा धक्के देत अश्लील चाळेही करीत होता. ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास मुलाला दादर येथे घेऊन जात असतांना त्याने तिचा पाठलाग करुन पुन्हा विनयभंग केला. तिने प्रतिकार केल्यानंतरही त्याने हा प्रकार सुरु ठेवल्याने तिने याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली. उपनिरीक्षक कृष्णा बाबर हे अधिक तपास करीत आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार ही सध्या पोलिसांसमोरील मोठी चिंतेची बाब आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Munked old man arrested