पालिकेची धडक कारवाई तिसऱ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:27 IST2019-11-08T00:26:56+5:302019-11-08T00:27:40+5:30
आजही कारवाई : १६७ हातगाड्या, २९ टपऱ्यांसह ३२१ बांधकामे जमीनदोस्त

पालिकेची धडक कारवाई तिसऱ्या दिवशीही सुरूच
ठाणे : अतिक्र मणमुक्त ठाणेसाठी तीन दिवस शहरात ठिकठिकाणी मोहीम राबविण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घोषित केल्यानंतर महापालिकेने गुरुवारी तिसºया दिवशी जवळपास १६७ हातगाड्या, २९ टपºया, १२ फेरीवाले, १२ पोस्टर्स, २३ बॅनर्स आणि फुटपाथवरील ३२१ बांधकामे जमीनदोस्त केली. गेले दोन दिवस ठाणे शहरामध्ये विविध परिसरांत अतिक्र मणविरोधी कारवाई जोरात सुरू असून गुरुवारी ही कारवाई करण्यात आली असून शुक्रवारपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
या कारवाईअंतर्गत वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील ४३ हातगाड्या, १२ पोस्टर्स, फुटपाथवरील २३ अतिक्र मणे, दिवा प्रभाग समितीमध्ये १८ हातगाड्या, फुटपाथवरील २७ अतिक्र मणे, माजिवडा प्रभाग समितीमध्ये फुटपाथवरील चार अतिक्र मणे, २१ हातगाड्या आणि तीन बॅनर्स, वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये फुटपाथवरील ५३ अतिक्र मणे, २७ हातगाड्या, नौपाडा प्रभाग समितीमध्ये फुटपाथवरील २५ अतिक्र मणे, सात हातगाड्या, लोकमान्य- सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये फुटपाथवरील ५५ अतिक्र मणे, १६ हातगाड्या, दोन टपºया, कळवा प्रभाग समितीत फुटपाथवरील २५ अतिक्र मणे, १३ हातगाड्या, दिवा प्रभाग समितीमध्ये फुटपाथवरील २७ अतिक्र मणे, १८ हातगाड्या, उथळसर प्रभाग समितीमध्ये ११ हातगाड्या, फुटपाथवरील २६ अतिक्र मणे, तर मुंब्रा प्रभाग समितीमध्ये ३२ हातगाड्या व १४ लाकडी बाकडे, १२ लोखंडी स्टॅण्ड, ११ पानटपºया, उसाच्या रसाच्या चार गाड्या, सहा कोंबड्यांचे पिंजरे, तीन शोरमागाड्या, आठ बॅनर्स, एक सिलिंडर, चार स्टील काउंटर, २२ ठेले, ३७ व्हेदर शेड निष्कासित करण्यात आले. शहरातील अतिक्र मणे, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवरील ही कारवाई सर्व सहायक आयुक्त यांनी पोलीस बंदोबस्तात केली असून उद्यापर्यंत ती सुरूच राहणार आहे.