अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे, महापालिकेचा फायरमन निलंबित; गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा ठाकरे गटाचा इशारा
By धीरज परब | Updated: February 25, 2025 23:21 IST2025-02-25T23:20:19+5:302025-02-25T23:21:33+5:30
Mira Road Crime News: मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलातील फायरमन ह्याला एलवयीन मुली सोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे . तर पॉस्को सह विनयभंग चा गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा उद्धवसेनेने दिला आहे.

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे, महापालिकेचा फायरमन निलंबित; गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा ठाकरे गटाचा इशारा
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलातील फायरमन ह्याला एलवयीन मुली सोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे . तर पॉस्को सह विनयभंग चा गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा उद्धवसेनेने दिला आहे .
महापालिकेच्या अग्निशमन दलात कार्यरत संजय म्हात्रे ह्या फायरमन ला दोन वर्षां पूर्वी अर्धांगवायू चा झटका आल्याने अग्निशमन केंद्रात तो बसून असतो . नवघर येथील अग्निशमन केंद्रात असलेल्या म्हात्रे याने एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याची व्हिडीओ क्लिप समोर आल्याने या प्रकरणी उद्धवसेनेच्या जिल्हा संघटक नीलम ढवण यांनी तक्रार करत ह्या घटनेचा निषेध केला . तसेच सदर कर्मचाऱ्यास निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली .
दरम्यान अग्निशन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांनी म्हात्रे याची बदली उत्तन अग्निशमन केंद्रात केली . मात्र इतक्या गंभीर प्रकरणी कडक कारवाई सह गुन्हा दाखल करण्याची गरज असताना बदली करून पालिका सारवासारव करत असल्याची टीका होऊ लागली .
अखेर म्हात्रे याला निलंबित केली असून या प्रकरणी पॉस्को सह विनयभंगचा गुन्हा दाखल करावा अन्यथा शिवसैनिक पालिकेच्या निषेधार्थ आंदोलन करतील असा इशारा ढवण यांनी दिला आहे .