शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिव मंदिर तलावाचे सुशोभीकरण पालिकेने करावे; खा. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:18 IST

वडवली येथील शिव मंदिर तलाव नेहमीच दुर्लक्षित होता. या तलावाच्या परिसराची अवस्थाही बिकट होती. तलावातील प्रदूषणाची पातळीही वाढली होती. या तलावातील गाळ काढण्याचा सरकारी खर्च हा चार कोटींच्या घरात होता

बदलापूर : या तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्याने तलावात मध्यभागी महादेवाची मोठी मूर्ती बसवण्यात आली आहे. या तलावाचे लोकार्पण खासदार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना शिंदे यांनी तलावाच्या कामाची स्तुती केली.

वडवली येथील शिव मंदिर तलाव नेहमीच दुर्लक्षित होता. या तलावाच्या परिसराची अवस्थाही बिकट होती. तलावातील प्रदूषणाची पातळीही वाढली होती. या तलावातील गाळ काढण्याचा सरकारी खर्च हा चार कोटींच्या घरात होता. त्यामुळे अंबरनाथ पालिका तलावातील गाळ काढण्यासाठी पुढे येत नव्हती. अखेर, बदलापूरमधील नगरसेवक तुकाराम म्हात्रे आणि सचिन भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्रित येऊन या तलावातील गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून करण्याचा निश्चय केला. दोन वर्षांत गाळ काढण्याचे काम पूर्ण केले. १० ते १२ फूट खोल गाळ काढून या तलावाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यात आले.

आज अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांनी सरकारलाही लाजवेल, असे काम केले आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे, असे शिंदे म्हणाले. दोन्ही पालिकांनी तलावाच्या सुशोभीकरणासाठी खर्च करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तुकाराम म्हात्रे यांनी आलेल्या अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी अनेक व्यक्तींनी केलेली मदत याची माहिती दिली.

सुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडाया तलावाच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येईल, असा आशावाद नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जगतसिंह गिरासे, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.हे काम पालिकेने करणे अपेक्षित आहे, ते काम नागरिकांनी एकत्रित येऊन केले आहे. लोकसहभागातून ६० लाख खर्च करून वडवली येथील शिव मंदिर तलावातील गाळ काढला. नागरिकांनी त्यांचे काम केले आहे. आता अंबरनाथ आणि बदलापूर पालिकांनी एकत्रित येऊन शिव मंदिर तलावाचे सुशोभीकरण करावे, अशी सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे केली.

टॅग्स :badlapurबदलापूरShrikant Shindeश्रीकांत शिंदे