मुंब्रा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना महापालिकेची पाच लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST2021-05-05T05:05:29+5:302021-05-05T05:05:29+5:30
ठाणे : मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयात २८ एप्रिल रोजी झालेल्या दुर्घटनेत चार रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या ...

मुंब्रा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना महापालिकेची पाच लाखांची मदत
ठाणे : मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयात २८ एप्रिल रोजी झालेल्या दुर्घटनेत चार रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना ठाणे महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते, त्यानुसार या मृतांच्या नातेवाइकांना सोमवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीचा धनादेश महापौर दालनात सुपूर्द करण्यात आला.
यावेळी विरोधी पक्ष नेते अशरफ पठाण, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती साधना जोशी, उपायुक्त मनीष जोशी, सहायक आयुक्त सागर साळुंखे उपस्थित होते.
कौसा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयात पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत हलिमा बी सलमानी, नवाब मजिद शेख, यास्मिन जफर सय्यद, हरी रामजी सोनावणे यांना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या नातेवाइकांना शासनाच्या माध्यमातून मदत देण्यात येईल, असे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे. तसेच ठाणे महापालिकाही मृतांच्या नातेवाइकांना मदत करेल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. या मृतांच्या नातेवाइकांना महापालिकेच्या माध्यमातून तातडीने मदत मिळावी यासाठी शानू पठाण हे देखील प्रयत्नशील होते. त्यानुसार सोमवारी मृतांचे नातेवाईक अनुक्रमे मोहम्मद रिझवान उलहकसलमानी, नझीरा नवाब शेख, बुशरा जफर सय्यद, विशाल हरी सोनावणे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.