शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ३९ बिल्डरांना महापालिकेच्या नोटिसा, हवा प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:39 IST

...या नियमावलीचे पालन न करणाऱ्या ३९ बांधकाम व्यावसायिकांनी नियमावलीचे तत्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम थांबविण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

ठाणे : हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २९७ पैकी ३९ बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महापालिकेने कारणे दाखवा नाेटिसा बजावल्या आहेत.  ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यामुळे २९७ बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले हाेते.  या नियमावलीचे पालन न करणाऱ्या ३९ बांधकाम व्यावसायिकांनी नियमावलीचे तत्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम थांबविण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

ठाण्यातील २९७ बांधकाम व्यावसायिकांपैकी ३१ जणांनी सर्व नियमावलीचे पालन केले,  तर १५१ जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे चार लाखांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावले आहे. ३९ जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये, अशी विचारणा करणारी नोटीस ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बजावली. त्यांच्याकडून नियमांची पूर्तता न झाल्यास काम तत्काळ थांबविण्याचे आदेश काढावेत, असे निर्देश माळवी यांनी दिले. सर्व २९७ बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केले.

अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आढावा- ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.- या उपाययोजनांचा आढावा बुधवारी  माळवी यांनी घेतला. या आढावा बैठकीस, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त पद्मश्री बैनाडे यांच्यासह महापालिकेचे अनेक  अधिकारी उपस्थित होते.

आदेश काय दिले?सर्व यंत्रणांनी महापालिकेच्या समन्वयाने उच्च न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश माळवी यांनी दिले. हवा प्रदूषणाबाबत महापालिकेकडे प्राप्त झालेल्या विविध तक्रारींबाबत पर्यावरण विभागाने १ लाख ७० हजारांच्या दंड वसुलीची कारवाई केल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, विकासकांनी प्रकल्पात, ५० ठिकाणी हवा प्रदूषण मोजणी यंत्र बसविले आहे. इतरांनीही ही यंत्रणा बसवावी. कुचराई झाल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा माळवींनी दिला. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाpollutionप्रदूषण