शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुंब्रा येथे पाच ठिकाणी एकाच मंडपात गणेश उत्सव आणि मोहरम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 9:52 PM

मुंब्रामध्ये नांदते अनोखी राष्ट्रीय एकात्मता    

कुमार बडदेमुंब्रा - "मजहब नही सिखाता आपसमे बैर रखना" या काव्यपंक्ती नुसार वेळोवेळी वागून राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण देणाऱ्या मुंब्र्यातील रहिवाशांनी पुन्हा एकदा एकाच मंडपात तसेच जवळजवळ गणेशोत्सव आणि मोहरमचे कार्यक्रम सादर केले. त्यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा अनोखी राष्ट्रीय एकात्मता दाखविली. ते दाखवत असलेल्या या अनोख्या राष्ट्रीय एकात्मतेमुळे एका ठिकाणी तर एकाच स्पिकर मधून आरती आणि मजलिसचे (मोहरनिमित्त साजरा होणारा धार्मिक कार्यक्रम) सूर बाहेर निघत असल्याचे विरळ दृश्य दिसत आहे.

नेहमीच एक दुसऱ्याच्या धर्माचा, भावनांचा आदर करुन सण, उत्सव साजरे करणारे येथील  हिंदू-मुस्लिम सध्या पाच  ठिकाणी  गणपती आणि मोहरमचे कार्यक्रम साजरे करत आहेत. नेहमीच संयमाने वागून येथील नागरिकांनी वेळोवेळी एकोपा जपला आहे. दोन्ही धर्मातील रुढी, परंपरा यांचा आदर  करण्याची यापूर्वीची परंपरा कायम ठेवण्याच्या हेतूने येथील काही गणेश मंडळांनी आणि मोहरम कमेटीने गणेश  उत्सव आणि मोहरमचे कार्यक्रम एकाच मंडपात साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आनंद कोळीवाडा येथील गणेश मित्र मंडळ तसेच विश्व मित्र मंडळ आणि चर्णीपाडा येथील एकता मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि मोहरम कमेटीचे पदाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर बैठक घेतली. त्यात झालेल्या चर्चेअंती वरील ठिकाणच्या दोन्हीं कडच्या पदाधिका-यांनी एकाच मंडपात गणपती उत्सव तसेच मोहरमचे कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती एका पोलिस अधिका-याने दिली.

गतवर्षीही त्यांनी राबवलेल्या या अनोख्या कल्पनेबद्दल काही मंडळाचा आणि मोहरम कमेटी मधील पदाधिका-यांचा पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते नुकताच ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या समारंभात सन्मानचिन्ह तसेच प्रशस्ती पत्रक देऊन  संत्कार करण्यात आला. दोन्ही  समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी दाखवलेल्या या सामजस्यां बद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. गणेश मित्र मंडळाच्या मंडपात तर आरती तसेच मोहरमनिमित्त होणारी मजलिस आणि थेट प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमासाठी दररोज एकाच माईकचा आणि स्पिकरचा वापर करण्यात येतो अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ सावंत आणि सल्लागार गिरिष आहिरे तसेच कार्यकर्ते प्रदिप देवरुखकर आदींनी लोकमतला दिली. 

टॅग्स :mumbraमुंब्राGanpati Festivalगणेशोत्सव