शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे हादरलं! १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन बाथरूमच्या खिडकीतून खाली फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 20:01 IST

मुंब्रा परिसरात एका १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली.

Mumbra Crime: ठाण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात १० मजली निवासी इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये १० वर्षांच्या मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर १० वर्षांच्या या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्री उशिरा पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिल्याबद्दल मुंब्रापोलिसांनी २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली.

सोमवारी रात्री ११.४८ वाजता मुंब्रा परिसरातील सम्राट नगर येथील श्रद्धा प्रति इमारतीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. १० वर्षीय मुलीच्या मृतदेहाची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. पीडित मुलगी ही इमारतीची रहिवासी नसल्याचे समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलगी इमारतीमध्ये कशी घुसली याचा तपास पोलिसांनी सुरु केला होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पीडित मुलगी अर्धनग्न अवस्थेत होती. 

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तीच्या घरी पाणी येत नव्हते. त्यामुळे तो आतमध्ये पाहण्यासाठी गेला असता मोठा आवाज झाला. त्याने खिडकी उघडून पाहिले तर तिथे एका १० वर्षांच्या मुलीचा मृतदेह पडलेला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. लोकांची  चौकशी केल्यानंतर आणि इमारतीतील घरांची तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना २० वर्षीय तरुणावर संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हा मूळचा बिहारचा रहिवासी असल्याचे समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रात्री ९:३० वाजता अल्पवयीन मुलीला खेळण्यांचे आमिष दाखवून त्याच्या घरामध्ये नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिला बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिले.

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्राCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस