शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा बायपास बनलाय पोलिस ‘एन्काऊंटर झोन’! याच भागात सापडला होता मनसुख हिरेनचाही मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 07:07 IST

खूप वर्षांपूर्वी मुंब्रा पोलिसांनी याच भागात खिडकाळीमधील एका गुंडाचा खात्मा केला होता

ठाणे : ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मुंब्रा बायपासवरील तीन किलोमीटरचा परिसर निर्जन असून, या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. याच परिसरात अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या चकमकीमध्ये मृत्यू झाला. याआधी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह याच भागात पोलिसांना मिळाला होता. त्याआधी खूप वर्षांपूर्वी मुंब्रा पोलिसांनी याच भागात खिडकाळीमधील एका गुंडाचा खात्मा केला होता. त्यामुळे मुंब्रा बायपास ठाण्यातील ‘एन्काऊंटर झोन’ आहे. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्सचा बँक रोड व वर्सोवा येथील गार्डन परिसर हा एकेकाळी असाच एन्काऊंटर स्पेशालिस्टचा आवडता एन्काऊंटर झोन होता.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षयचा ठाणे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाल्यामुळे अनेक वादांना तोंड फुटले आहे. मुंब्रा बायपासवरील या निर्जन व सीसीटीव्हीच्या कक्षेत नसलेल्या रस्त्यावरून अक्षयला का आणले, त्याचा एन्काऊंटर करायचा होता म्हणूनच हा परिसर निवडला का? असे सवाल केले जात आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या कारचे मालक आणि या प्रकरणातील एकमेव साक्षीदार मनसुख हिरेन यांचा मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणातही वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. हिरेन यांचा मृतदेह याच भागातील मुंब्रा खाडी परिसरात मार्च २०२१ मध्ये मिळाला होता.  हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य आहे. रात्री तेथे अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे लूटमारीच्या घटना घडतात. अनेकजण ठाण्याकडे जाण्याकरिता भिवंडी बायपास किंवा महापेचा पर्याय निवडतात. या भागात पोलिस चौकीही नाही. मुंब्रा देवीकडे जाणाऱ्या या मार्गावर जोडप्यांना लुटण्याचे प्रकारही घडले आहेत.

अनेक योगायोग कसे जुळले?

अक्षयचा मृत्यू ज्या पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांच्या बंदुकीतील गोळीमुळे झाला ते मध्यवर्ती शोध पथकात १५ दिवसांपूर्वी दाखल झाले. वेगवेगळ्या कारणांनी यापूर्वी ते वादग्रस्त ठरले होते.

एक आरोपी शिंदेंच्या ताब्यातून पळाल्यामुळे त्यांचे निलंबन झाले होते. एन्काऊंटरफेम रवींद्र आग्रे, वादग्रस्त प्रदीप शर्मा यांच्या पथकातही ते होते. त्यामुळेच शिंदेंकडे सीआययूचा चार्ज येणे, अक्षयच्या दुसऱ्या पत्नीने केलेल्या तक्रारींचा तपास सोपवला जाणे आणि मुंब्रा बायपासवरच अक्षय प्रक्षुब्ध होणे, हे योगायोग कसे जुळून आले, असे सवाल उपस्थित होत आहेत.

मुंब्रा बायपासवरील फुटेज ताब्यात घेणार 

ठाणे शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या ८०० सीसीटीव्ही बसवले आहेत. कल्याणमध्ये ५०० सीसीटीव्ही आहेत. मुंबईत दहा हजारांच्या घरात सीसीटीव्ही आहेत. राज्य मंत्रिमंडळाने सुमारे ६०० कोटी खर्च करून ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सहा हजार सीसीटीव्ही लावण्याला मंजुरी दिली आहे. तळोजा ते मुंब्रा बायपास या मार्गावरील सर्व सीसीटीव्हींचे फुटेज जपून ठेवून ते ताब्यात घेण्याचे पत्र संबंधितांना दिले आहे, अशी माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.  

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस