बाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणायचे; एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 20:06 IST2025-08-03T20:05:05+5:302025-08-03T20:06:07+5:30

उद्धव गटाच्या मुंबईतील माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

Mumbaikars who have left should be brought back to Mumbai; Eknath Shinde | बाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणायचे; एकनाथ शिंदे

बाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणायचे; एकनाथ शिंदे

ठाणे: आम्ही आराेपाला आराेपातून नव्हे तर कामातून उत्तर देताे. काम करणाऱ्यांना लाेकांनी आशिर्वाद दिला. जे घरी बसतात, त्यांना घरी बसविले. आता काही लाेक आमच्यामुळे बाहेर िफरु लागले आहेत. मुंबईला खऱ्या अर्थाने वैभव मिळवून द्यायचे आहे. मुंबईत परवडणारी घरे मिळाली पाहिजेत. त्यासाठी हाऊसिंग पाॅलिसी केली. मुंबईच्या बाहेर मुंबईकर फेकला गेला, त्याला जबाबदार कोण ? याचा विचार केला पाहिजे. एसआरएच्या माध्यमातून पुनर्विकास करुन वसई विरार, बदलापूर पर्यंत बाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणायचा आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी यांनी ठाण्यात दिली.

मुंबईतील सायन काेळीवाडा प्रभाग क्रमांक १७३ मधील माजी नगरसेवक रामदास कांबळे, शाखासंघटक नंदा शाहू तसेच इतर कार्यकर्त्यांनी माेठया संख्येने शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमातील कार्यक्रमात हा पक्षप्रवेश झाला. या कार्यकर्त्यांचे स्वागत करतांना शिंदे यांनी मुंबईच्या विकासाचे त्यांना आश्वासन दिले.

गेल्या अडीच वर्षात मुंबईत विकासाची कामे झाली. त्याच विकासाच्या कामांसाठी, लाेकांच्या आणि प्रभागाच्या विकासासाठी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. काेणतीही अपेक्षा न ठेवता विकास कामांची यादी देतच कांबळे यांनी या पक्षात प्रवेश केल्याचे ते म्हणाले. मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री हाेताच घेतला. त्याचा एक टप्पा पूर्ण होतोय , दुसरा टप्पा लवकर पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईत खड्डा शोधावा लागेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात सर्व तपासण्या करण्यासाठी १६०० कोटींची तरतूद करण्यासाठी आपण आयुक्तांना सांगितले. अशा निर्णयांमुळे काही लाेकांची दुकाने बंद झाल्याचा टाेलाही त्यांनी विराेधकांना लगावला. निवडणुका आल्या की मुंबई तोडणार अशी आवई दिली जाते. तसे काेणी करुच शकणार नाही. लाेकाभिमुख कामे करायची आहेत. आपल्यावरील विश्वास सार्थ करु. मुंबईला खऱ्या अर्थाने वैभव मिळवून द्यायचे असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

कांबळे युवासेनेच्या कार्यकारीणी सदस्यपदी नियुक्ती

कांबळे यांची युवासेनेच्या कार्यकारीणी सदस्यपदी शिंदे यांनी नियुक्ती केली. शिंदे गटात माजी नगरसेवकांची संख्या आता १२४ झाल्याचे सांगून शिवसेना भाजप महायुती मजबूत झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी विकासाच्या प्रवासात सामील व्हावे, देव त्यांना सद्बुद्धी देवो, अशा शुभेच्छा त्यांनी राजकीय विराेधकांना मैत्रीदिनानिमित्त यावेळी दिल्या.

Web Title: Mumbaikars who have left should be brought back to Mumbai; Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.