शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मुंबई मनपाने टीएमटीच्या बसथांब्यांसह कंट्रोल रूमही तोडली, प्रवासी उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:25 IST

ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेत नवा वाद रंगण्याची चिन्हे

ठाणे : मुलुंड रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेल्या टीएमटीच्या दोन बसथांब्यांवर आणि एका कंट्रोल रूमवर मुंबई महापालिकेने कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेत चांगलाच नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मुंबई महापालिकेने टीएमटीच्या या बसथांब्यांवर कारवाई केली असून याच परिसरात असलेल्या दुकानांवर मात्र ती केलेली नसल्याचा आरोप परिवहन प्रशासनाने केला आहे. या मार्गावर टीएमटीचे जवळपास ५० हजार प्रवासी दैनंदिन प्रवास करत असून बसथांब्यांवरच कारवाई केल्याने या प्रवाशांची उन्हामुळे आता गैरसोय होऊ लागली आहे.दुसरीकडे ज्या जागेवर हे बसथांबे बांधले होते, त्या ठिकाणी जलवाहिनी टाकण्याच्या कामांसाठी ही कारवाई केली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बसथांबे बांधून देण्याची मुंबई महापालिकेने तयारी दर्शवली असली, तरी मुंबई महापालिकेने योग्य पद्धतीने समन्वय करून ही कारवाई करणे अपेक्षित होते, असे टीएमटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.मुंबईत ५० टीएमटीच्या ४७२ फेऱ्यामुलुंड पश्चिमेला राज्य परिवहन महामंडळाची रीतसर परवानगी घेऊन हे बसथांबे उभारले आहेत. ठाणे ते मुलुंडच्या या मार्गावर ५० पेक्षा अधिक बस धावतात. तर, ४७२ दैनंदिन फेºया होत असून ११ मार्गांवर टीएमटी प्रवासी सेवा देते. तर, जवळपास ५० हजारांपेक्षा जास्त प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असून या बसथांब्यांवर आता कारवाई केल्याने या सर्व प्रवाशांची आणि या बसथांब्यांवरील टीएमटीच्या कर्मचाऱ्यांचीदेखील गैरसोय झाली आहे. बसथांब्यांच्या शेडची सुविधा नसल्याने प्रवाशांना फुटपाथच्या खाली उन्हात उभे राहावे लागत आहे.ठाण्यातील बेस्टचे थांबे अनधिकृत?ज्याप्रमाणे टीएमटीची सेवा मुंबई महापालिकेच्या हद्दीत सुरू आहे, त्याचप्रमाणे बेस्टच्यादेखील २०० पेक्षा अधिक दररोज फेºया ठाण्यात होत आहेत. यामध्ये बेस्टला टीएमटीच्या बसथांब्यांचा वापर करावा लागतो. त्यासाठी टीएमटीकडून कोणत्याही प्रकारची हरकत घेतली जात नाही. मात्र, ज्या ठिकाणी बेस्टने बसथांबे उभारले आहेत, ते ठाणे महापालिकेची रीतसर परवानगी घेऊन उभारले आहेत का, असा प्रश्न आता यानिमित्ताने टीएमटी प्रशासनाने केला आहे.बाजूच्या गाळ्यांना मात्र अभयमुलुंड पश्चिमेला असलेल्या टी विभागातील जटाशंकर डोसा रोडच्या पूर्वेला ज्या ठिकाणी फुटपाथवर टीएमटीचे बसथांबे आहेत, त्या ठिकाणी पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिनी उपलब्ध नसल्याने हे सर्व पाणी मुलुंड रेल्वेस्थानकामध्ये घुसते. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्याचे कारण देऊन मुंबई महापालिकेने ही कारवाई केली असल्याचे पत्र टीएमटी प्रशासनाला दिले आहे. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी टीएमटी प्रशासनाला लेखी स्वरूपात पत्र देणे अपेक्षित असताना मुंबई महापालिकेने टीएमटी प्रशासनाला ते पाठवले नसल्याचे टीएमटीने स्पष्ट केले आहे. एकीकडे टीएमटीच्या बसथांब्यांवर कारवाई केली जाते. मात्र, बाजूलाच असलेल्या गाळ्यांसंदर्भात मात्र डोळेझाक केली जात असल्याचा आरोप आता टीएमटी प्रशासन आणि प्रवाशांकडून होऊ लागला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका