स्वच्छतेसाठी मुळगाव खंडोबा मंदिर डोंगरावरर कचऱ्याच्या डब्यांची सोय
By सुरेश लोखंडे | Updated: February 25, 2024 19:11 IST2024-02-25T19:10:50+5:302024-02-25T19:11:00+5:30
या खंडाेबा मंदिर परिसरात जागोजागी कचरा करू नये ,याबद्दल जनजागृती करणारे बॅनर्स क्लब मार्फत लावण्यात आले आहेत.

स्वच्छतेसाठी मुळगाव खंडोबा मंदिर डोंगरावरर कचऱ्याच्या डब्यांची सोय
ठाणे : जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात मुळगाव खंडोबा मंदिर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र डाेंगरावर आहे. तेथे भाविकाची सतत येजा असते. त्यामुळे तेथे अस्वच्छता वाढण्याची भीती आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करूनटरी क्लब ऑफ बदलापूर मार्फत या डोंगरावर २० कचऱ्याचे डबे बसविण्यात आले. त्यामुळे आता स्वच्छता राहण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.
या खंडाेबा मंदिर परिसरात जागोजागी कचरा करू नये ,याबद्दल जनजागृती करणारे बॅनर्स क्लब मार्फत लावण्यात आले आहेत. मंदिरात येणारे पर्यटक मंदिर परिसरात असलेल्या जंगलात पाण्याच्या बॉटल, खाऊचे प्लास्टिक व इतर कचरा टाकल्याने निसर्गाचा समतोल बिघडत होता, पण आता कचऱ्याचे डब्यांमुळे जंगल परिसरात होणारा कचरा कमीं होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन क्लब चे अध्यक्ष रोटे.डॉ.दिलिप चौधरी यांनी व्यक्त केले. या प्रकल्पाचे अनावरण सहायक प्रांतपाल रोटे. सचिन पितांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लब सचिव रोटे. आशुतोष कुळकर्णी, प्रकल्प प्रमुख रोटे.विशाल दिघे, रोटे. शिरीष सराफ, रोटे.प्रदीप देवधर उपस्थित होते.