शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘म्युकरमायकोसिस’चा आढळला रुग्ण, जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 08:28 IST

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री या ५६ वर्षीय महिलेला कोरोनावरील उपचाराकरिता दाखल केले. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधून रुग्णाची तपासणी करण्याचा सल्ला दिला.

ठाणे : कोरोनातून ठाणे जिल्हा सावरत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा पहिला रुग्ण आढळला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत असून, या म्युकरमायकोसिस आजारात रुग्णांचे डोळे निकामी होत आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत, असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची गांभीर्याने दाखल घेत, त्यांच्या काही चाचण्या केल्या. त्या चाचणी अहवालातून त्यांना म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री या ५६ वर्षीय महिलेला कोरोनावरील उपचाराकरिता दाखल केले. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधून रुग्णाची तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी त्या महिला रुग्णांची तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेचे डोळे पुढे आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नव्हती. तसेच प्रकाश दाखवल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातील बाहुलीची  हालचाल होत नव्हती. त्यानंतर त्यांचे सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मास पेशींना सूज असल्याचे दिसून आले. तर, सायनसमध्येही सूज असल्याचे स्पष्ट झाले. तिला म्युकरमायकोसिस हा आजार झाल्याच्या निर्णयाप्रत डॉक्टर आले आहेत. जिल्ह्यातील या आजाराची बहुतेक ही पहिली रुग्ण आहे. जिल्ह्यातील खासगी नेत्रतज्ज्ञांकडे आणखी कुणी रुग्ण म्युकरमायकोसिसवर यापूर्वीच उपचार घेत असतील तर त्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही.जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बरा होण्याकरिता बहुतांश रुग्णांना डॉक्टर स्टीरॉइड देत आहेत. मधुमेहाने आजारी असलेल्या रुग्णांना स्टीरॉइड दिले व त्यामुळे त्यांची रक्तशर्करा वाढली त्याचवेळी रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती खालावली तर अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस नावाचा आजार आढळून येतो. रुग्णांच्या डोळ्यांवर या आजारात परिणाम होतो. रुग्णांचे डोळे निकामी होण्याचा धोका असतो. हे प्रमाण वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजाराचे सायनसमधून संक्रमण होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. रुग्णांना वेळीच उपचार मिळाले नाहीत तर पॅरालिसिस आणि मृत्यूही येण्याची शक्यता असते.

कुठेही होऊ शकतो आजार म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आता आढळून येऊ लागले आहेत. म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीसारखा असतो. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरड्यांमध्ये तसेच छातीतदेखील होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

काय आहेत लक्षणे?वरच्या पापणीला सूज, ती खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, दोन वस्तू दिसणे, नाकावर सूज, चेहऱ्यावर एका बाजूने सूज, डोळ्यांमध्ये वेदना ही या आजाराची लक्षणे आहेत.

या रुग्णांना अधिक धोका रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या, मधुमेह असलेल्यांना या नवीन आजाराचा धोका अधिक आहे. कोरोना वाढल्यास अँटिव्हायरल आणि स्टेरॉइड द्यावेच लागतात. या औषधांनी रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका आहे.

एका महिला रुग्णाला म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. मात्र, हा आजार स्टेरोईडच्या किंवा अँटिबायोटिकच्या अतिसेवनामुळे झाला असल्याची शक्यता आहे. या आजाराची गांभीर्याने दाखल घेत, त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

कोरोनापाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोकेवर काढल्याने रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस