शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

उल्हासनगरात विकास आराखड्याची मनसेकडून होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 2:31 PM

शहर विकास आराखडा झोपडपट्टीवरून नांगर फिरवणार व बिल्डरधार्जिना आहे. असा आरोप मनसेने करून शिवाजी चौकात दुपारी आराखड्याची होळी केली.

उल्हासनगर-  शहर विकास आराखडा झोपडपट्टीवरून नांगर फिरवणार व बिल्डरधार्जिना आहे. असा आरोप मनसेने करून शिवाजी चौकात दुपारी आराखड्याची होळी केली. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली.उल्हासनगर विकास आराखडा गेल्या महिन्याच्या शेवटी प्रसिद्ध झाला. आराखडा दोन विभागात प्रसिद्ध झाला. आराखड्यातील पहिल्या भागातील बदलासाठी, महासभेत प्रस्ताव आणावा लागणार असून प्रस्ताव बहुमतांनी मंजूर करून शासनाकडे पाठवावा लागणार आहे. तर दुसऱ्या भागासाठी हरकत व सूचना घेण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी कोकण विभाग संचालक  नगररचनाकार यांच्याकडे हरकत घ्यावी लागणार आहे. आराखड्यातील पहिल्या अंतिम भागात आरक्षित भूखंड, खुले मैदान, बंद कंपन्या, मैदाने, उद्याने आदी ठिकाणी रहिवासी क्षेत्र दाखविले आहे. तर झोपडपट्टी, शाळा-महाविद्यालय, रस्ते आदी ठिकाणी हरितपट्टा दाखवून धनदांडगे व बिल्डरांचे हितसंबंध जपल्याची टीका शहरातून होत आहे. 

शहर आराखड्याच्या दुसऱ्या भागात, 120 फुटाचा रीग रोड जात आहे. रिंग रोड 120 फुटाचा  असून बहुतांश झोपडपट्टीवरून जात आहे. त्यामुळे हजारो नागरीक बेघर होणार आहे. तसेच कबरस्थान आरक्षित भूखंडा वरून हटवून सम्राट अशोकनगर येथील झोपडपट्टी व मराठी शाळेवर कबरस्थान टाकले. त्यामुळे झोपडपट्टी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्याला असंतोषाला वाचा फोडण्यासाठी, शनिवारी संघर्ष समिती व राजकीय पक्षांनी पालिका महासभेवर मोर्चाचे आयोजन केले आहे.

मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे, संजय घुगे, जिल्हाउपाध्यक्ष सचिन कदम, विध्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष मनोज शेलार, मेनुहिद्दीन शेख यांच्यासह शेकडो जणांनी दुपारी 12 वाजता शिवाजी चौकात एकत्र येऊन विकास आराखड्याची होळी केली.