वाढीव वीजबिलाच्या तक्रारींकडे महावितरण कंपनीचे अद्यापही दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:24 AM2020-10-03T00:24:25+5:302020-10-03T00:24:34+5:30

सरासरी बिलांमध्येही मोठी तफावत : मनसेचा आंदोलनाचा इशारा

MSEDCL still ignores complaints of increased electricity bills | वाढीव वीजबिलाच्या तक्रारींकडे महावितरण कंपनीचे अद्यापही दुर्लक्ष

वाढीव वीजबिलाच्या तक्रारींकडे महावितरण कंपनीचे अद्यापही दुर्लक्ष

googlenewsNext

ठाणे : यशोधननगर येथील रहिवाशांना दोन वेगवेगळ्या वीजमीटरवरील ग्राहक क्रमांक एकच देऊन एकाला सरासरीपेक्षा अधिक, तर दुसऱ्याला कमी बिल देणाºया महावितरणच्या भोंगळ कारभाराने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या शनिवारपर्यंत सोडवण्यात येईल, असे आश्वासन महावितरणने दिले होते. परंतु, अद्याप ती सोडविली नसल्याने महावितरणला मनसे स्टाइलने धडा शिकवण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

पंचशील अपार्टमेंट, यशोधननगर येथील वीजग्राहक संजय पाटील व दीपाली परब या दोन वेगवेगळ्या वीजग्राहकांच्या विद्युतमीटरवर ग्राहक क्रमांक एकच असून, पाटील यांच्या वीजदेयकावर वीजवाचन (रीडिंग) उपलब्ध नाही, असे येत आहे, तर परब यांना एका महिन्यात ७०० ते ८०० युनिटचे रीडिंग यायला लागले आहे. पाटील यांच्या घरात भाडेतत्त्वावर राहणाºया गणेश सुतार यांना शेवटचे बिल ३३० रुपये, तर परब यांना ३२ हजार रुपये आल्याने दोन्ही ग्राहकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्या. वीजबिल कमी येत असल्याने सुतार हे गेल्या १० महिन्यांपासून महावितरणकडे खेपा घालत आहेत. त्यांना महावितरणचे संबंधित अधिकारी, कर्मचारी उद्धट वागणूक देत असल्याने त्यांनी मनसेकडे धाव घेतली. मनसे शाखाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी ही बाब महावितरण अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर ग्राहकांची समस्या तातडीने दूर करण्याचे आश्वासन दिले. अद्याप ही समस्या दूर न झाल्याने महावितरणच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कांबळे यांनी दिला.

या दोन्ही ग्राहकांचे मीटर बदलले आहेत. परंतु, वाढीव बिल हे ग्राहकांना भरावेच लागेल. यात महावितरणची चूक नाही.
- नारायण सोनावळे, कार्यकारी अभियंता

Web Title: MSEDCL still ignores complaints of increased electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.