‘महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील ग्राहकांशी सौजन्याने वागावे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 00:30 IST2020-09-28T00:29:49+5:302020-09-28T00:30:06+5:30
लॉकडाऊनकाळात महावितरणने सरासरी बिलआकारणी करण्याचे धोरण राबवले. जुलैपासून मागील बिलातील युनिटमधील तफावतीसह बिलआकारणी करण्यास सुरुवात केली

‘महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील ग्राहकांशी सौजन्याने वागावे’
ठाणे : वाढीव वीजबिलाने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. तक्रार करण्यास गेलेल्या नागरिकांना आधी वीजबिल भरा, अशी भूमिका महावितरणने घेतली असल्याने वाढीव वीजबिले पाठवून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाºया या महावितरणला मनसेने इशारा दिला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, असेही आपल्या इशाºयात म्हटले आहे.
लॉकडाऊनकाळात महावितरणने सरासरी बिलआकारणी करण्याचे धोरण राबवले. जुलैपासून मागील बिलातील युनिटमधील तफावतीसह बिलआकारणी करण्यास सुरुवात केली आणि महागोंधळ सुरू झाला. अनेकांना हजारोंची बिले यायला लागली.
आर्थिक, वैद्यकीय कारणाने त्रस्त झालेल्या नागरिकांची अवस्था महावितरणच्या या भोंगळ कारभाराने दुष्काळात तेरावा महिना अशी झाली. अनेकांनी अशाही परिस्थितीत बिले भरली.
ज्यांची बिले अवास्तव होती, त्यांनी महावितरण कार्यालयात बिलआकारणीसंदर्भात धाव घेतली. परंतु, बहुतांश अधिकारी आणि कर्मचाºयांनी आधी बिल भरा, अशी भूमिका घेतल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी मनसेने वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता सुनील माने, अनिल पाटील यांची भेट घेऊन बिलांसंदर्भात नागरिकांच्या व्यथा मांडल्या.
च्अधिकारी आणि कर्मचाºयांनी सर्वसामान्यांना सौजन्याने वागवावे, अन्यथा होणाºया परिणामांना आपण जबाबदार असाल, असा इशाराही देण्यात आला.
च्या बैठकीस मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, उपशहराध्यक्ष मनोहर चव्हाण, शहर सचिव नैनेश पाटणकर, रवींद्र सोनार, विभाग सचिव रवींद्र पाटील, संदीप साळुंखे, राजेंद्र कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.