शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

विद्यार्थी संख्ये अभावी जि.प.ची ब्रिटीशकालीन कन्या शाळेसह बीजे हायस्कूल एकत्र करण्याच्या हालचाली

By सुरेश लोखंडे | Updated: September 24, 2018 18:11 IST

सकाळीभरणाऱ्या या बी. जे . हायस्कूलच्या पटावर ६३ विद्यार्थी आहेत. पण प्रत्यक्षात सुमारे ४० ते ४२ विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळते. याच वास्तूत कन्या शाळा दुपारच्या सत्रात भरते. या कन्या शाळेच्या पटावर ६६ विद्यार्थीनी आहेत. मात्र केवळ ३० ते ३८ विद्यार्थीनींची वर्गात रोजची उपस्थिती असते. ठाणे जिल्हा परिषदेच्या या दोन्ही हायस्कूलांमध्ये ५ ते दहावीचे वर्ग आहेत. पण दोन्ही शाळांची विद्यार्थी संख्या सुमारे ७०च्या जवळपास आहे.

ठळक मुद्देठाणे जिल्हा परिषदेची कन्या शाळा ब्रिटीश कालीनग्रामीण भागातील एक हजार ३६३ शाळा डीजीटल केल्या‘ बेटी पढाव और बेटी बढाव’ असे शासनाचे उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद इमारतीला लागून असलेल्या कन्या शाळा प्रगतही करता आली नाहीमहिलां व मुलींचे सबली करण्याच्या घोषणा करणाऱ्यां प्रशासनाला गरीब, दीन दलितांच्या मुलींच्या कन्या शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारता आला नाही

सुरेश लोखंडेठाणे : येथील जिल्हा परिषदेची कन्या शाळा ब्रिटीश कालीन असून याच दरम्यान ची बी.जे. हायस्कूल आहे. पण आता या दोन्ही शाळा कन्या शाळेच्या वास्तूत भरत आहे. या दोन्ही हायस्कूलमध्ये सुमारे ७० विद्यार्थी, विद्यार्थींनींची उपस्थिती आढळते. या अत्यल्प उपस्थितीमुळे या दोन्ही शाळा एकत्र करून एक हायस्कूल सुरू ठेवायची की ठाणे महापालिकेच्या शाळेत या विद्यार्थ्यांना समाविष्ठ करावे आदींसाठी प्रशासकीय हालचाली जोर धरू लागल्या आहेत.बी. जे हायस्कूलचे काम सुरू असल्यामुळे ही शाळा मागील काही वर्षांपासून कन्या शाळेच्या वास्तूत भरते. सकाळीभरणाऱ्या या बी. जे . हायस्कूलच्या पटावर ६३ विद्यार्थी आहेत. पण प्रत्यक्षात सुमारे ४० ते ४२ विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळते. याच वास्तूत कन्या शाळा दुपारच्या सत्रात भरते. या कन्या शाळेच्या पटावर ६६ विद्यार्थीनी आहेत. मात्र केवळ ३० ते ३८ विद्यार्थीनींची वर्गात रोजची उपस्थिती असते. ठाणे जिल्हा परिषदेच्या या दोन्ही हायस्कूलांमध्ये ५ ते दहावीचे वर्ग आहेत. पण दोन्ही शाळांची विद्यार्थी संख्या सुमारे ७०च्या जवळपास आहे. या दोन्ही शाळांमध्ये अल्प विद्यार्थी संख्या आहे. यामुळे कन्या शाळा बी. जे. हायस्कूलमध्ये समाविष्ठ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानंतर ही बी.जे. हायस्कूल बांधलेल्या नवीन इमारतीमध्ये सुरू करण्याचा प्रशासनाचे प्रयत्न आहेत.प्रशासनाच्या या हालचाली संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांना विचारणा केली असता. त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा शासनाचा तसा जीआर आहे. त्यास अनुसरून या शाळांचे एकत्रिकरण करण्याचे काम सुरू आहे. जूनपर्यंत ते पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बढे यांनी सांगितले. कन्या शाळेचे इमारतही ब्रिटीश कालीन असल्यामुळे ती आता धोकादायक झाली. या शळेचा वरचा मजला आधीच पाडून इमारतीचा भार कमी केला आहे. धोकादायक नसलेल्या वर्गखोल्यांमध्ये या दोन्ही हायस्कूल दोन सत्रात या वास्तूमध्ये सुरू आहे.पण आताही कन्या शाळेची वास्तू पाडण्याचाही प्रयत्न सुरू आहे. यानंतर त्यावर काय बांधणार यावर मात्र प्रशासनाकडून काहीच सांगितले जात नाही. ग्रामीण भागातील एक हजार ३६३ शाळा डीजीटल केल्याचा दावा करणाºया जिल्हा परिषदेचे मात्र शहरातील या दोन हायस्कूलकडे दुर्लक्ष झाले. यामुळे येथील विद्यार्थी संख्या रोडावली. शहरातील अन्य शांळामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. ग्रामीणमधील दहा शाळा विद्यार्थी संख्ये अभावी बंदही कराव्या लागल्या. मात्र ही नामुष्की पचवण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ९५० शाळा प्रगत केल्याचा दावा जात आहे. पण जिल्हा परिषद इमारतीला लागून असलेल्या कन्या शाळा प्रगतही करता आली नाही आणि विद्यार्थी संख्याही जिल्हा परिषदेला वाढवता आली नाही.ब्रिटीशकालीन असलेल्या या कन्या शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याची गरज होती व आहे. पण केवळ महिलां व मुलींचे सबली करण्याच्या घोषणा करणाऱ्यां प्रशासनाला गरीब, दीन दलितांच्या मुलींच्या कन्या शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारता आला नाही. भले मोठे प्रांगण असलेल्या या शाळेला सुसज्य करता आली नाही. ‘ बेटी पढाव और बेटी बढाव’ असे शासनाचे उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद शहरातील या कन्या शाळेला डिजीटल करू शकली नाही. शहराच्या अतिमहत्वाच्या ठिकाणच्या या शाळेच्या भूखंडावर लक्ष केंद्रीत करून आगामी सहा महिन्यात ही कन्या शाळा तोडण्याचे प्रयत्न आहेत. यामुळे शहरातील हक्काच्या शाळेपासून या सावित्रिच्या लेकी वंचित होतील. त्यांना हक्काचे शिक्षण महागड्या शाळेत घेणे शक्य नसल्याचे उघड होत आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा