शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

बेकायदा बांधकामावरील कारवाईत चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 5:58 PM

डोंबिवली: बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या मंदिराच्या बांधकामावर कारवाई करण्यात चालढकलपणा सुरू असल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी गुरूवारी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील फ प्रभाग अधिकारी अमित पंडीत यांच्या दालनात अर्धनग्न अवस्थेत धरणे आंदोलन छेडले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची आई मालती, पत्नी धनश्री हे देखील होते.

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्याचे अर्धनग्न अवस्थेत धरणेकेडीएमसीच्या विभागीय कार्यालयात छेडले आंदोलन

डोंबिवली: बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या मंदिराच्या बांधकामावर कारवाई करण्यात चालढकलपणा सुरू असल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी गुरूवारी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील फ प्रभाग अधिकारी अमित पंडीत यांच्या दालनात अर्धनग्न अवस्थेत धरणे आंदोलन छेडले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची आई मालती, पत्नी धनश्री हे देखील होते.येथील पुर्वेकडील मानपाडा रोडवर उभारण्यात आलेल्या मंदिराचे बांधकाम हे बेकायदेशीर असून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी निंबाळकर हे गेल्या तीन वर्षापासून केडीएमसीकडे सातत्याने करीत आहेत. कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी यापुर्वी आंदोलनेही छेडली आहेत. बेकायदेशीर मंदिरा विरोधात आवाज उठविला म्हणुन मागील वर्षी २२ मार्चला त्यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील झाला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आजवर चार आरोपी पकडण्यात आले आहेत तर अन्य चौघे आरोपी आणि मुख्य सुत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अन्य आरोपी अटक का केले जात नाही तसेच संबंधित बांधकामावर कारवाई का होत नाही याबाबत निंबाळकरांनी रामनगर पोलिसांसह केडीएमसीला आंदोलनाचे पत्र दिले होते. यावर गुरूवारी सकाळीच डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी निंबाळकर यांना पोलिस ठाण्यात बोलावून कारवाई सुरू असल्याची माहीती दिली. वाडेकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर पोलिस ठाण्यातील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय निंबाळकरांनी घेतला. त्यानंतर दुपारी तीन वाजता निंबाळकर यांनी केडीएमसी विभागीय कार्यालय गाठले. ते फ प्रभागक्षेत्र अधिकारी अमित पंडीत यांच्या दालनात गेले असता तेथे कोणीही उपस्थित नव्हते. आंदोलनाचे पत्र देऊनही चर्चेसाठी अधिकारी उपस्थित राहत नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करीत कार्यालयातच अर्धनग्न अवस्थेत धरणे आंदोलन छेडले. माझ्यावर झालेल्या हल्ल्याला वर्षाचा कालावधी लोटला पण आजही त्या बांधकामावर कारवाई होत नाहीये. मी मेल्यावरच कारवाई होणार का? असा सवाल निंबाळकरांनी यावेळी केला. गरीबाला कोणीही वाली नाही अशा शब्दात त्यांच्या आई मालती यांनीही प्रशासनाच्या भुमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधित मंदिर हे अधिकृत असल्याचे अधिका-यांकडून सांगितले जात होते. यावर पुरावे सादर करा अशी मागणी निंबाळकर यांनी केली. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.आंदोलनाची आगाऊ कल्पना नाहीदरम्यान अचानक झालेल्या आंदोलनामुळे सुरक्षारक्षकांची एकच तारांबळ उडाली. त्यांना आंदोलनाची पुर्वकल्पना प्रशासनाकडून देण्यात आलेली नव्हती. ज्यावेळी आंदोलनाला सुरूवात झाली त्यावेळी विभागीय कार्यालयात कोणीही वरीष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. अधिकारी न्यायालयीन कामकाजासाठी गेल्याची माहीती कर्मचा-यांकडून देण्यात आली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तेव्हा अधिकारी उपस्थित नसल्याबाबत पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली