शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मोखाडा तहानलेलाच

By admin | Updated: February 17, 2016 01:44 IST

तालुक्यात पाच मोठ्या धरणामुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा असुनही याचे नियोजन शासनपातळीवर केले जात नसल्याने मोखाडा तालुका तहानलेलाच आहे व पाणी टंचाई समस्या येथे भीषण असताना देखील

रवींद्र साळवे,  मोखाडातालुक्यात पाच मोठ्या धरणामुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा असुनही याचे नियोजन शासनपातळीवर केले जात नसल्याने मोखाडा तालुका तहानलेलाच आहे व पाणी टंचाई समस्या येथे भीषण असताना देखील स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही व यामुळे घोटभर पाण्यासाठी येथील आदिवासी वणवण भटकंती करावी लागत आहे. ८५ हजार लोकसंख्या असलेल्या मोखाडा तालुक्यात ५९ महसुल गावे व १४७ पाडे असून दरवर्षीच निम्यापेक्षाा अधिक गावपाड्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो व या टंचाईग्रस्त गावपाड्याना पाणीपुरवठा करत असताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. परंतु यावर्षी मात्र पाणीटंचाईचा प्रश्न आतापासून समोर येवून ठाकला असून फेब्रुवारी महिन्यातच ५ गावे आणि १० पाडे कोरडे पडले आहेत. त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. अद्याप कडक उन्हाळा सुरू झाला नाही. त्या आधीच अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मार्च-एप्रिल-मे पाणीटंचाईची समस्या गंभीर होईल याचे चित्र आताच डोळ्यासमोर उभे आहे. परंतु याकडे गंभीरतेने लक्ष दिले जात नाही.तसेच मुबलक पाणीसाठा असतानाही प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि नियोजनाचा अभाव यामुळे तहानलेल्या गावांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. तालुक्यातील मारूतीची वाडी, कारेगाव, खोप, पळसपाडा, मोऱ्हाडा या ठिकाणी मोठी धरणे आहेत परंतु करोडो रू. खर्चून बांधलेल्या धरणाचा लगतच्या गावपाड्यांना काही एक फायदा झालेला नाही. शासनाने करोडो रू. खर्चून मोठी मोठी धरणे बांधली खरी परंतु त्याचे नियोजन मात्र केलेलेच नाही. यामुळे या धरणाच्या लगतच्या गावपाड्याची घोटभर पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.