मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:50 IST2018-06-02T01:50:09+5:302018-06-02T01:50:09+5:30

पोटच्या अडीच वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर जन्मदात्री आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पश्चिमेतील मांडा येथील जानकी विद्यालयाशेजारच्या मनोरमा चाळीत घडली आहे.

Mother committed suicide by killing her daughter | मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

टिटवाळा : पोटच्या अडीच वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर जन्मदात्री आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पश्चिमेतील मांडा येथील जानकी विद्यालयाशेजारच्या मनोरमा चाळीत घडली आहे.
शोभा कोकणे (२५) ही पती किसन आणि मुलगी आकांशासह तेथे राहत होती. पती सकाळी कामावर गेल्यानंतर शोभा मुलीसह घरात होती. सायंकाळी नळाला पाणी आल्याने शेजारी राहणाऱ्या महिला तिला बोलावण्यासाठी आल्या. मात्र, बराचवेळ तिने दार उघडले गेले नाही. महिलांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले.
शोभाने घराच्या छताला दोरीने गळफास घेतल्याचे घटनास्थळी पोलिसांना आढळले. तर हॉलमधील बेडवर आकांशा उताण्या अवस्थेत मृत पडलेली दिसली. त्यामुळे शोभाने आत्महत्येपूर्वी मुलीला गळा दाबून मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Mother committed suicide by killing her daughter