शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

धसईमध्ये कोरोनामुळे आई, मुलाचा मृत्यू; बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा करणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 09:17 IST

नागरिक मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, लग्नसमारंभात गर्दी करणे, यामुळे चार दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण सापडले आहेत.

मुरबाड : गेेली दोन महिने तालुक्यात कमी झालेला कोरोना पुन्हा सक्रिय झाला आहे. धसईत एकाच दिवशी आई, मुलाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.  दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही येथील कोविड सेंटर बंद केले होते. चार दिवसांपूर्वी पाच रुग्ण सापडल्याने त्यांच्यावर बदलापूर,  कल्याण येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते; परंतु दोन दिवसांत रुग्णांची संख्या ३२ वर गेल्याने बंद केलेले कोविड सेंटर सुरू करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांनी दिली.   नागरिक मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, लग्नसमारंभात गर्दी करणे, यामुळे चार दिवसांत मोठ्या संख्येने रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी  खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेला मुलगा व होम क्वारंटाइन असलेल्या आईचा कोरानाने मृत्यू झाला. तर, शुक्रवारी सात रुग्ण आढळले. नव्याने सापडणारे रुग्ण बदलापूर व कल्याण येथील कोविड सेंटरमध्ये जाण्यास तयार होत नाहीत. तरीही तिघांना बदलापूरला पाठवले आहे. २२ जण होम क्वारंटाइन आहेत. दरम्यान, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केल्यास प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश येऊ शकेल, असे बनसोडे यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल