शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

‘मोराची बायको’ अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:00 AM

येले यांचे बालपण भाडुंप येथे गेले.

जान्हवी मोर्ये

डोंबिवली : कविता, कथा आणि नाटक या तिन्ही साहित्य प्रकारांत लीलया मुशाफिरी करणारे नवोदित लेखक किरण येले यांच्या ‘मोराची बायको’ या कथा संग्रहातील शीर्षक कथेचा यंदाच्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बीएच्या अभ्यासक्रमातील मराठी विषयात समावेश झाला आहे. दरम्यान, या अभ्यासक्रमात जुने-नवे लेखक आणि कवींच्या साहित्य प्रवाहाचा समावेश आहे, अशी माहिती येले यांनी दिली.

येले यांचे बालपण भाडुंप येथे गेले. ते १९९७ मध्ये अंबरनाथ येथे स्थायिक झाले. ग्रंथाली प्रकाशनाने त्यांचा ‘मोराची बायको’ हा कथासंग्रह १ जानेवारी २०१८ ला प्रकाशित केला. पहिली आवृत्ती हातोहात संपल्याने या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती १ सप्टेंबर २०१८ ला प्रसिद्ध झाली. तसेच अनेक मान-सन्मान या कथासंग्रहाने मिळविलेले आहेत. मान्यवर समीक्षकांनी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून साक्षेपी भाष्य या कथासंग्रहावर केले आहे. कल्याणच्या काव्यमंच संस्थेने दोन तासांचा कार्यक्रमही सादर केला होता. या कथासंग्रहात सात कथा आहेत. त्यातील एक कथेवर फिल्म बनविण्यात येत आहे. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘बाई, आमिबा आणि स्टील ग्लास’ या नाटकाचे लेखनही येले यांनी केले आहे.‘मोराची बायको’ ही एका नात्याविषयीची कथा असून, त्यात कल्पना आणि वास्तव मांडलेले आहे. या कथेचा अभ्यासक्रमात समावेश झाल्याचे येले यांना आधी बाहेरून समजले. त्यानंतर शिक्षण खात्याने त्यांना ई-मेल पाठवून ‘मोराची बायको’चा अभ्यासक्रमात समावेशक रण्याची परवानगी मागितली. त्याला येले यांनी परवानगी दिली.अनेक पुरस्कारांचे मानकरीयेले यांची तीन नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली आहेत. तसेच त्यांचे दोन कवितासंग्रहदेखील प्रकाशित झाले आहेत. मालिकाचे लिखाणही त्यांनी केले आहे. येले यांना डॉ. अनंत लाभसेटवार फाउंडेशनचा (यूएसए) साहित्य पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार, डॉ. द. ता. भोसले वाचनालय, सोलापूर यांचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार आणि सार्वजनिक वाचनालय, नाशिकचा पु. ना. पंडित पुरस्कार मिळाला आहे.

टॅग्स :thaneठाणे