शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:43 AM

केंद्र सरकारला अहवाल देणार। शुक्रवारी अडकले होते वाहतूककोंडीत

ठाणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पाच हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या वस्तुस्थितीची दोनदिवसीय पाहणी केंद्रीय पथकाने शनिवारी ठिकठिकाणी जाऊन केली. शनिवारी पाऊस असतानाही छत्र्यांच्या मदतीने पथकातील अधिकाऱ्यांनी पीक व जमीन नुकसानीची पाहणी केली. याचा अहवाल ते केंद्र शासनाला देणार आहेत.

केंद्र शासनाच्या या पीक नुकसान पाहणी पथकाकडून शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भातपिकासह शेतजमिनीच्या नुकसानीची पाहणी केली. शुक्रवारी रायगडहून येताना या पथकास वाहतूककोंडीचा फटका बसला. पेणजवळील हमरापूर परिसरात वाहतूककोंडीत अडकले होते. तरी, शुक्रवारी संध्याकाळी बारवी येथील विश्रामगृहात गेल्यानंतर पीकपाहणीचे पे्रझेंटेशन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देऊन शनिवारी सकाळीच नियोजनानुसार अंबरनाथ तालुक्यातील कसगाव येथील पीकनुकसानीची पाहणी केली. याशिवाय, बदलापूरजवळील हेंदरेपाडा, रमेशनगर येथील नुकसानग्रस्त घरांची पाहणी या अधिकाºयांनी केली.कल्याण तालुक्यातील आणे, वासुंद्री, कोंढेरी येथील भातपिकांच्या नुकसानीची पाहणी या केंद्रीय पथकाने केली. यामध्ये केंद्राच्या इलेक्ट्रिकल अ‍ॅथॉरिटीचे सहसंचालक ओम किशोर यांच्यासह केंद्रीय पाणीआयोगाचे संचालक मिलिंद पानपाटील, केंद्राच्या रस्ते वाहतूक महामार्गाचे अधीक्षक अभियंता संजय जैस्वाल, पीएफसीचे संचालक चित्तरंजन दास आदी केंद्रीय पथकातील अधिकाºयांसह ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी उपसंचालक सावंत, तालुका कृषी अधिकारी शिल्पा निखाडे, संजय पायस, रामचंद्र घुडे आदी अधिकारी या पीक, शेतजमीन नुकसान पाहणी पथकात सामाविष्ट होते.या पथकाने जिल्ह्यातील पाच हजार ८०० हेक्टर पिकांची, तर ८७ हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीचीदेखील वस्तुस्थितीची पाहणी या पथकाने केली. या पाहणी दौºयात कल्याण तालुक्यात वसात-शेलवली येथील पीक नुकसानीच्या पाहणीसह आणे व भिसोळ येथील घरांच्या आणि पिकांच्या नुकसानीच्या पाहणीचे नियोजन केले होते. त्याुनसार, या पथकाने पाहणी केली. यामध्ये कल्याण तालुक्यातील वसुंद्री व सांगोडे येथील पीक नुकसानीची पाहणी या दौºयात करण्यात आली.१०,२७५ मालमत्तांचे नुकसानगेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्टच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदीनाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले.यामुळे १० हजार २७५ खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर, एक हजार ५१८ घरांची पूर्णत: तर काहींची अंशत: पडझड झाली. जिल्हाभरात तब्बल २७ जणांचा या पूरआपत्तीत मृत्यू झाला. या अतिवृष्टीमुळे सहा हजार १०० कुटुंबांना व ५०० व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात निराधार व्हावे लागले होते.एवढेच नव्हे तर गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यासारखी १०४ जनावरे पुराच्या पाण्यात दगावली आहेत. सुमारे पाच हजार ८८७ हेक्टरवरील भातपीक नष्ट झाले आहे. याशिवाय, ८७ हेक्टरवरील शेतजमीन या पूरस्थितीत नापीक झाल्याचे शेतकºयांकडून ऐकायला मिळत आहे. 

टॅग्स :thaneठाणेST Strikeएसटी संप