आधारकार्डसाठी रखडलेल्याना आता मानधन; राज्यातील ४३३६ अंगणवाडी सेविकांना धिलासा
By सुरेश लोखंडे | Updated: November 5, 2018 19:01 IST2018-11-05T18:51:19+5:302018-11-05T19:01:35+5:30
राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागांमध्ये एक लाख ९७ हजार ९६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. यापैकी एक लाख ९२ हजार ७६० सेविकांचे मानधन आता ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीव्दारे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र उर्वरित चार हजार ३३६ अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांनी त्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी सलग्न केला नाही.

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने या सेविकांचे मानधन जुन्या पध्दतीने काढण्याचे आदेश १ नोव्हेबर जारी केले.
ठाणे : अंगणवाडी सेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्याममुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडी सेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. पण दिवाळीच्या मुहूर्तावर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने या सेविकांचे मानधन जुन्या पध्दतीने काढण्याचे आदेश १ नोव्हेबर जारी केले. यामुळे राज्यभरातील सेविकांना धिलासा मिळाला असून त्यांची दिवाळी गोड झाली.
राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागांमध्ये एक लाख ९७ हजार ९६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. यापैकी एक लाख ९२ हजार ७६० सेविकांचे मानधन आता ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीव्दारे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र उर्वरित चार हजार ३३६ अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांनी त्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी सलग्न केला नाही. यामुळे त्यांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले आहे. ऐन दिवाळीत या सेविकाना मानधनापासून वंचित ठेवणे योग्य नसल्याची जाणीव होताच शासनाने या सेविकांचे मानधन जुन्या पध्दतीने जारी करण्याचे आदेश जारी केले.
या शासन निर्णयामुळे बँक खाती आधारकार्डशी संलग्न झालेले नाही, अशा अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांचे रखडलेले आॅगस्ट ते डिसेंबर या कालावधीमधील मानधन जुन्या पद्धतीने देण्यासाठी शासनाने मान्यता देऊन तसा शासन निर्णयही जारी केला आहे. यानंतरचे मानधन मात्र ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीव्दारे बँक खात्यात जमा होईल. त्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांना देखील जबाबदारीने संबंधीत सेविकांकडून आधारकार्ड बँक खात्याशी सलग्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.‘पीएफएमबी’ प्रणालीत खाते जोडणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका सहकार्य करीत नसतील तर संबंधित अधिकाºयांबरोबर अंगणवाडी सेविकांवर देखील जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरु द्ध कारवाई करण्यात येईल असे सुद्धा आदेश देण्यात आले आहे. यामुळे सेविकांनी तातडीने बँक खात्याशी आधारकार्ड सलग्न करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राजेश सिंह यांनी केले आहे.