‘बँकेतील पैसा नीरव, तर घरातील पैसा नरेंद्र मोदी घेऊन जातात’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 05:47 AM2019-11-09T05:47:45+5:302019-11-09T05:48:13+5:30

युवक काँगे्रसने तळले पकोडे

'Money in the bank is silent, while Narendra Modi takes home money' | ‘बँकेतील पैसा नीरव, तर घरातील पैसा नरेंद्र मोदी घेऊन जातात’

‘बँकेतील पैसा नीरव, तर घरातील पैसा नरेंद्र मोदी घेऊन जातात’

Next

ठाणे : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात बेकारांची संख्या वाढली आहे. आणीबाणीच्या काळातही तीन ते चार हजार लोक जेलमध्ये गेले होते. परंतु, काश्मीरमध्ये हजारो लोक आज जेलमध्ये असल्याचा अनुभव घेत असल्याची टीका काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी शुक्रवारी ठाण्यात केली. तसेच स्वकष्टाचा पैसा बँकेत ठेवला, तर नीरव मोदी घेऊन जातो आणि घरी ठेवले तर नरेंद्र मोदी घेऊन जातात, असा आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध काँग्रेसने देशव्यापी आंदोलनास ५ नोव्हेंबरपासून सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने ८ नोव्हेंबर रोजी ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर केंद्रातील भाजप सरकारविरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना मोहन प्रकाश यांनी हा संताप व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, सद्य:स्थितीतील देशाच्या दुरवस्थेला पूर्णत: भाजपप्रणीत केंद्र सरकारची धोरणे कारणीभूत असून वेळीच याचा विरोध केला पाहिजे, असेही ते म्हणाले. माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष कानडे, ठाणे काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे, प्रदेश काँग्रेस सचिव के. वृषाली, महिला काँग्रेस अध्यक्ष शिल्पा सोनोने, इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, संजय घाडीगावकर आणि रवींद्र आंग्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

युवक काँगे्रसने तळले पकोडे
धरणे आंदोलनात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उच्चशिक्षित तरु णांना रोजगारासाठी पकोडे विकण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या सरकारचा पकोडे
तळून निषेध व्यक्त केला. महिला कार्यकर्त्यांनीही सिलिंडरचे भाव वाढल्याचा निषेध केला. तर, सडक्या भाज्यांचे प्रदर्शन या वेळी भरवण्यात आले.
 

Web Title: 'Money in the bank is silent, while Narendra Modi takes home money'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.