केंद्रातील मोदी सरकारने आपली विश्वासार्हताच गमावलीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:47+5:302021-06-20T04:26:47+5:30

ठाणे : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस आपली विश्वासार्हता गमावत चालली असून, येत्या काही दिवसांतच ...

The Modi government at the Center has lost its credibility | केंद्रातील मोदी सरकारने आपली विश्वासार्हताच गमावलीय

केंद्रातील मोदी सरकारने आपली विश्वासार्हताच गमावलीय

ठाणे : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस आपली विश्वासार्हता गमावत चालली असून, येत्या काही दिवसांतच युवानेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष अधिकाधिक मजबूत होत चालला आहे. आगामी काळात हे चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश इंटक काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी ठाण्यात व्यक्त केला. समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकाच्या कायम पाठीशी राहण्याचा काँग्रेसचा धर्म आहे आणि म्हणूनच काँग्रेसला कायम या घटकांनी मदतच केली असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

ठाण्यातील इंटक काँग्रेसने राहुल गांधी यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त ५१ किन्नर कुंठुबांतील लोकांना जीवनावश्यक साहित्य वाटून वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश छाजेड उपस्थित होते. यावेळी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे व प्रवीण खैरालिया, तसेच प्रवक्ते रमेश इंदिसे, ब्लाॅक अध्यक्ष संदीप शिंदे, रवींद्र कोळी, महेंद्र म्हात्रे, बाबू यादव, प्रसाद पाटील, स्वप्नील कोळी, रेखा मिरजकर, रमेश पाटील, चंद्रकांत मोहिते, शीतल आहेर, सुप्रिया पाटील, मीनाक्षी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The Modi government at the Center has lost its credibility