रुग्णालय सुरक्षेसाठी मोबाइल व्हॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:55 IST2018-05-30T00:55:53+5:302018-05-30T00:55:53+5:30

ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रु ग्णालयातून बाळ चोरी असो या चिमुरडीवरील अत्याचार तसेच तरुणीचा विनयभंग या एका पाठोपाठ घडलेल्या तीन घटनांमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेच्या अबु्रचे

Mobile Van for Hospital Safety | रुग्णालय सुरक्षेसाठी मोबाइल व्हॅन

रुग्णालय सुरक्षेसाठी मोबाइल व्हॅन

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रु ग्णालयातून बाळ चोरी असो या चिमुरडीवरील अत्याचार तसेच तरुणीचा विनयभंग या एका पाठोपाठ घडलेल्या तीन घटनांमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेच्या अबु्रचे धिंदवडे निघाल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सुरक्षा लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी रुग्णालय आवारात एक पोलीस मोबाइल व्हॅन उभी केली आहे. तसेच रुग्णालयातील बंद असलेले पाच सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांच्या पत्रव्यवहारानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने सुरू केले. तर,विनयभंग प्रकरणी पाहिजे असलेल्या त्या आरोपीच्या शोध घेण्यासाठी दोन पथके तैनात केली.
पीडित तरुणीचे वडील हे क्षयरोग या आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना ठाणे सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्याचसोबत पीडित तरुणीची आई दिवसभर तर ती रात्री थांबते. बुधवारी रात्री ती रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील तळ मजल्यावरील एका बाकड्यावर झोपी गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत अन्य रुग्णाचे नातेवाईकही झोपले होते. दरम्यान आरोपी ही तेथे झोपला होता. गुरूवारी पहाटे ३.३० वाजता तो तिच्याशी अश्लिल चाळे करू लागल्यावर तिने आरडाओरड करताच त्याने तेथून पळ काढला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तिने केलेल्या वर्णनानुसार,त्याचे तत्काळ रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांची चौकशी
या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही.धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेनगर पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचारी आणि पीडित तरुणीच्या नातेवाईकांची अशा २०-२५ जणांची चौकशी केली. या चौकशीत त्या आरोपीला कोणीही यापूर्वी कधीच पाहीले नाही. त्यातच सीसीटीव्ही बंद असल्याने त्याला शोधणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हानच आहे.दोन पथके तैनात
या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीचे पीडित तरुणीच्या माहितीनुसार रेखाचित्र काढले आहे.तसेच त्याला शोधण्यासाठी विशेष दोन पथके तैनात केली आहेत. ाटना घडली तेंव्हा घटनास्थळाचे आणि मुख्य गेटवरील सीसीटीव्ही कॅमेरा असे रुग्णालयाचा आवारातील एकूण पाच कॅमेरे बंद होते. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या पत्रव्यवहारानंतर, रुग्णालय प्रशासनाने आता ते कॅमेरे सुरू केले आहेत.

Web Title: Mobile Van for Hospital Safety