मनसेचे हायटेक निवडणूक कार्यालय आयोगाच्या रडारवर

By Admin | Updated: January 31, 2017 03:27 IST2017-01-31T03:27:29+5:302017-01-31T03:27:29+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील घंटाळी भागात निवडणुकीसाठी विशेष हायटेक कार्यालय शनिवारी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सुरू केले. परंतु, आता हे हायटेक कार्यालय

MNS's hi-tech election office is on the radar of the commission | मनसेचे हायटेक निवडणूक कार्यालय आयोगाच्या रडारवर

मनसेचे हायटेक निवडणूक कार्यालय आयोगाच्या रडारवर

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील घंटाळी भागात निवडणुकीसाठी विशेष हायटेक कार्यालय शनिवारी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सुरू केले. परंतु, आता हे हायटेक कार्यालय आयोगाच्या रडारवर आले आहे.
ते सुरू करताना परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली असून याविरोधात आता निवडणूक विभागाने स्थानिक पोलीस ठाण्याला पत्र दिले आहे. मनसेप्रमाणे इतर पक्षांनी शहरामध्ये निवडणूक विभागाची परवानगी न घेता किती कार्यालये उघडली आहेत, याची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
अशा प्रकारे परवानगी न घेता कार्यालये सुरू करणाऱ्यांवर स्थानिक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाण्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपली निवडणूक कार्यालये ठिकठिकाणी थाटली असून यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हायटेक कार्यालयाचा समावेश आहे. शनिवारी मोठ्या थाटामाटात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. एवढ्या मोठ्या स्वरूपात उद्घाटनाचा कार्यक्र म आयोजित केला असतानाही स्थानिक नेत्यांनी ते करताना तसेच हे कार्यालय सुरू करताना निवडणूक विभागाची परवानगी घेण्याची तसदी घेतली नसल्याने हा सर्व प्रकार आता मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारानंतर आता निवडणूक विभागाने या सर्व प्रकारची दखल घेऊन स्थानिक पोलीस ठाण्याला सर्व अहवाल दिला असून आता त्यांच्या माध्यमातून आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
निवडणूक विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष त्यात्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ््या राजकीय पक्षांच्या कार्यलयाची माहिती घेण्याचे काम करत असून लवकरच सर्व निवडणूक कार्यालयांची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: MNS's hi-tech election office is on the radar of the commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.