कर्जतमध्ये मनसेची दोन दिवसीय सहकार परिषद; राज ठाकरे राहणार उपस्थित 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 07:34 AM2023-12-28T07:34:44+5:302023-12-28T07:35:25+5:30

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही परिषद होणार आहे.

mns two day cooperation conference in karjat raj thackeray will be present | कर्जतमध्ये मनसेची दोन दिवसीय सहकार परिषद; राज ठाकरे राहणार उपस्थित 

कर्जतमध्ये मनसेची दोन दिवसीय सहकार परिषद; राज ठाकरे राहणार उपस्थित 

लोकमत न्यूज नेटवर्क, कर्जतMarathi News ): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यस्तरीय सहकार परिषद ६ आणि ७ जानेवारी २०२४ रोजी कर्जत येथे होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही परिषद होणार आहे. नेरळ जवळील धामोते येथील डिकव्हर रिसॉर्ट येथे दोन दिवस निवासी शिबिराचे आयोजन केले आहे.

मनसे सहकार सेना यांच्यावतीने दरवर्षी राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन केले जाते. या सहकार परिषदेची माहिती देण्यासाठी मनसे सहकार सेलचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ही माहिती दिली. यावेळी धोत्रे यांनी सांगितले की, ६ जानेवारीला परिषदेचे उदघाटन आणि मार्गदर्शन राज ठाकरे आणि अमित ठाकरे करणार असून, सहकार सेलचे राज्यातील सर्व पदाधिकारी आणि मनसेचे सर्व जिल्हा अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. 

उदघाटन सत्रानंतर वित्तीय सहकारी संस्था या परिसंवादमध्ये महाराष्ट्र राज्य शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनारकर हे मार्गदर्शन करतील. सुरेश म्हसे कृषी विषयक योजना तर पक्ष बांधणीबाबत नेते अनिल शिदोरे मार्गदर्शन करणार आहेत. 

 

Web Title: mns two day cooperation conference in karjat raj thackeray will be present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.