...म्हणून माझ्याविरुद्ध तडिपारीचे षड्यंत्र- अविनाश जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:47 IST2020-08-14T00:46:51+5:302020-08-14T00:47:03+5:30
गुरूवारी झाले विरार पोलिसांसमोर हजर

...म्हणून माझ्याविरुद्ध तडिपारीचे षड्यंत्र- अविनाश जाधव
नालासोपारा : आपल्यावर दाखल असलेले गुन्हे हे राजकीय असून आपण खुनी किंवा दरोडेखोर नाही. सध्या आपल्याविरोधात सुरू असलेले प्रकार हा षड्यंत्राचा भाग आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना केला आहे.
विरार येथील महानगरपालिका मुख्यालयात घातलेल्या राड्याप्रकरणी विरार पोलिसांकडून अविनाश जाधव यांना तडिपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. आपल्याला तडिपार का करण्यात येऊ नये, याबाबतची बाजू ऐकून घेण्यासाठी जाधव यांना विरार उपविभागीय अधिकारी कार्यालयात गुरुवारी बोलावण्यात आले होते. ते पोलिसांसमोर गुरुवारी दाखल झाले. यादरम्यान मनसे कार्यकर्त्यांची जाधव यांना समर्थन देण्यासाठी गर्दी झाली होती. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.