शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात मनसेने केले ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 21:01 IST

आपल्या आप्तेष्टाचा जीव वाचवायचा असेल तर गंभीर अस्वस्थेतील रुग्णांना येथे आणू नये असे आवाहन करणारा फलक मनसेने लावला

मीरारोड - महापालिका व शासनाच्या कात्रीत अडकलेले भाईंदरचे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला असून याला सत्ताधारी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप करत मनसेने रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले. आपल्या आप्तेष्टाचा जीव वाचवायचा असेल तर गंभीर अस्वस्थेतील रुग्णांना येथे आणू नये असे आवाहन करणारा फलक मनसेने लावला. 

मीरा भाईंदर महापालिकेने सुरु केलेले जोशी रुग्णालय हे सुरुवातीपासून वादग्रस्त ठरले आहे. दिड महिन्यापूर्वी सदर रुग्णालय शासनाला कागदोपत्री हस्तांतरित झाले असले तरी वैद्यकीय सेवा उलट खालावत चालली आहे. २४ जुलैपासून रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला असून यात १६ ते २३ वयोवर्षांच्या मुलं, तरुणाचा समावेश आहे. आधीच विविध तक्रारी त्यात मुलांचे मृत्यू झाल्याने आज मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे, सुषमा बाठे, अनु पाटील, सोनिया फर्नांडिस, रेश्मा तपासे, शहनाझ, गौरवी जाधव , कविता वायंगणकर,  हेमंत सावंत, दिनेश कनावजे, शशी मेंडन, रफिक पठाण, विजय फर्नांडिस, रॉबर्ट डिसोझा, हरीश सुतार, सूर्या पवार, नितीन बोंबले, जितू शेणॉय आदी पदाधिकाऱ्यांसह मनसैनिकांनी रुग्णालयाच्या आवारात निदर्शने केली. पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे येऊन उत्तर देत नाहीत तोपर्यंत हलणार नाही असे सांगत मनसैनिकांनी रुग्णालयात धरणे धरले. मनसेने रुग्णालयाच्या आतील प्रवेशद्वारावर फलक लावून रुग्णालयात अत्यावश्यक सेवा - सुविधा नसल्याने नागरिकांनी आपल्या आप्तेष्टाना जोशी रुग्णालयात दाखल करू नये असे आवाहन केले. भाईंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रेय बोराटे सह पोलीस पथक तसेच दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी धावून आले. डॉ. पानपट्टे रुग्णालयात आल्या नंतर शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली . 

रुग्णालय म्हणून अत्यावश्यक आयसीयू , एनआयसीयु , व्हेंटिलेटर , तज्ञ डॉक्टर आदी आवश्यक सुविधाच नसल्याने येथे रुग्णाचे मृत्यू होत असून याला पालिका व सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला . वेळीच न होणारे उपचार व तपासणी , डॉक्टर - परिचारिका , लॅब टेक्निशियन आदी जागेवर नसल्याच्या तक्रारी नित्याच्याच झाल्या आहेत . कामावर असताना कर्मचारी मोबाईलवर खेळत बसतात , रुग्ण वा नातलगांशी अरेरावी केली जाते असा पाढाच मनसे पदाधिकाऱ्यांनी वाचला. त्यावर रुग्णालय हे शासनास हस्तांतरित झाले असून पालिका केवळ सहकार्य करत आहे. येत्या काही महिन्यात आयसीयू आदी सर्व सुविधा सुरु होतील. तुमचे निवेदन शासनाला पाठवू तसेच रुग्णालयात सध्या देण्यात येणाऱ्या सुविधा व वैद्यकीय उपचार याचे माहितीचे फलक लावू असे आश्वासन डॉ . पानपट्टे यांनी दिले.  दरम्यान डॉ . पानपट्टे यांनी मनसेचे शिष्टमंडळ जाताच रुग्णालयातील डॉक्टर , परिचारिका , सुरक्षा रक्षक, कर्मचारी आदींची तातडीची बैठक घेतली. कामाच्या वेळात जागेवर हजर रहा, मोबाईल वर खेळू नका, रुग्ण - नातलगांशी चांगले वागा अश्या सूचना करतानाच तक्रार आल्यास निलंबनाची कारवाई करू असा इशारा दिला. येणाऱ्या रुग्णाची स्थिती समजून घ्या व आपल्या कडे उपचार होणार नसतील तर तसे त्यांना तातडीने मार्गदर्शन करा. रुग्ण - नातलग यांच्याशी गोडीने व समजूतदारपणे वागा. अरेरावी, उद्धट वागू नका अशी समज त्यांना दिली. 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकmira roadमीरा रोडhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMNSमनसे