शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मनसे-राष्ट्रवादीचा अवघा रंग एक झाला, परांजपे अन् जाधवांची एकमेकांवर रंगांची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 14:05 IST

बुरा ना मानो होली है म्हणत ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून लोकसभा निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले आहेत.

ठाणे : बुरा ना मानो होली है म्हणत ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून लोकसभा निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी एकमेकांना रंग लावून येत्या २३ मे रोजी एकत्रच गुलाल उधळू असे जाहीर केले आहे. अविनाश जाधव आणि आनंद परांजपे यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यात मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले असून शिवसेनेला ही निवडणूक आता फारशी सोपी नसल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .रंगमंचामीच्या निमित्ताने ठाण्यात पक्ष आणि राजकीय मतभेद विसरून एकमेकांना रंग लावण्याची परंपरा तशी जुनीच आहे. मात्र यंदाही वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने यावेळी या सणाला राजकीय रंग चढला होता. राज ठाकरे यांनी या आधीच आपला पक्ष निवडणूक लढवणार नसल्याचे सांगून अद्याप कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र ठाण्यात रंगपंचमीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकाच रंगात भिजताना दिसले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना रंगपंचीमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परांजपे आणि जाधव या एकमेकांना एकाच रंग लावून आपला एकच रंग असल्याचं जाहीर केले. विशेष म्हणजे मनसेने आयोजित केलेल्या धुलीवंदनाच्या कार्यक्रमात आनंद परांजपे यांना निमंत्रित करण्यात आले होते.ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विचारे आणि परांजपे यांच्यामध्ये थेट लढत होणार असून, जर मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा मिळाल्यास शिवसेना पक्षाच्या अडचणी काही प्रमाणात वाढणार असल्याने ठाणे लोकसभेची निवडणूक शिवसेनेला काही प्रमाणात कठीण जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे." होळीच्या सर्वाना शुभेच्छा देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत . त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही . मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी रंगपंचमी साजरी केली असून २३ मे आम्ही गुलाल उधळू हि आम्हाला खात्री आहे "- आनंद परांजपे , अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे" आमचा रंग हा एकच रंग आहे . देशात जे सुरु आहे त्यापेक्षा आम्ही चांगले रंग उधळायला सुरुवात केली असून २३ मे रोजी उडणारा रंग चांगल्या पर्यायाची नांदी असेल असा माझा विश्वास आहे . "- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे

टॅग्स :MNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणेHoliहोळी