शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ‘ठामपा’साठी मनसे, राकाँ, काँग्रेस आघाडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:06 IST

नवे समीकरण; युतीविरोधात फॉर्म्युला

- अजित मांडके ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेच्या अविनाश जाधव यांना मिळालेली ७२ हजार मते ही येत्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत युतीकरिता धोक्याची घंटा आहे. ठाणे मतदारसंघ शिवसेनेला स्वत:कडे खेचून घ्यायचा होता. मात्र, भाजपने तो सोडला नाही व भाजपच्या संजय केळकर यांनी राखला. मात्र, मनसेने घेतलेली मते लक्षात घेता महापालिकेत युतीत बेबनाव निर्माण झाल्यास तो मनसेच्या पथ्यावर पडायला वेळ लागणार नाही.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या गडावर कमळ फुलवले. त्यानंतर, आता झालेल्या निवडणुकीत संजय केळकर यांनी हा गड राखला असला, तरी मताधिक्यात घसरण झाली आहे. मतदारसंघावर शिवसेना, भाजपचे वर्चस्व असतानाही घटलेल्या मताधिक्यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न आहे. मागील निवडणुकीत मनसेला केवळ आठ हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यात तब्बल ६४ हजार ८७४ मतांची वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत ठाणे विधानसभेत युतीच्या बालेकिल्ल्याला शह देण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अशीच हातमिळवणी केली, तर ते समीकरण युतीला घातक ठरणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे यांना ८३ हजारांची निर्णायक आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभेला येथील गणित सोपे असेल, असे बोलले जात होते. परंतु, ते तितके सोपे नसल्याचे दिसून आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सुमारे ३५ ते ४० हजार मते मनसेला मिळाल्याचे बोलले जाते. जाधव यांना राबोडी, महागिरी यासारख्या भागांतून चांगली मते मिळाल्याचे दिसून आले.शिवसेना आणि भाजपतील सुप्त संघर्षाचा फटका केळकर यांना बसल्याची चर्चा आहे.

घोडबंदरचा काही भाग, कोलशेत, बाळकुम, ढोकाळी, राबोडी, टेकडी बंगला, वृंदावन, श्रीरंग, महागिरी, हिरानंदानी मेडोज या शहरातील काही महत्त्वाच्या भागातूनही मनसेला आघाडी मिळाल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता, या सर्व भागांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांचे वर्चस्व आहे. असे असतानाही त्या भागातील मतदारांनी विरोधात मतदान केल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे १२ नगरसेवक असून भाजपचे १९ नगरसेवक आहेत. असे असतानाही मताधिक्य घटले, हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेच्या ज्या मंडळींचा केळकर यांना विरोध होता, त्यांच्याच क्षेत्रामधील मतांमध्ये दिसून येणारी घट बोलकी आहे.

आघाडीचा मनसेला लाभ

विधानसभेत भाजपला पराभूत करण्याकरिता मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी दिसली. त्याचा फायदा मनसेला झाला. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा हीच आघाडी दिसणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांत इच्छुक जास्त असल्याने अशी तीन पक्षांची आघाडी करण्यात मर्यादा असल्या, तरी युतीवर मात करण्याचा हा मार्ग विरोधकांना दिसला आहे.

टॅग्स :MNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस